डॉक्टर म्हणजे विश्वासाचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:21+5:302021-07-03T04:07:21+5:30

काटोल : जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येकाचा डॉक्टरांशी संबंध येतो. डॉक्टर म्हणजे विश्वासाचे नाते असते. जगात परमेश्वरानंतर डॉक्टरांवर लोकांचा विश्वास ...

A doctor is a relationship of trust | डॉक्टर म्हणजे विश्वासाचे नाते

डॉक्टर म्हणजे विश्वासाचे नाते

काटोल : जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येकाचा डॉक्टरांशी संबंध येतो. डॉक्टर म्हणजे विश्वासाचे नाते असते. जगात परमेश्वरानंतर डॉक्टरांवर लोकांचा विश्वास जास्त असतो. डॉ. सचिन चिंचे यांनी कोविड काळात नि:स्वार्थ सेवा केली. ते वैद्यकीय क्षेत्रातील काटोलचे भूषण असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले. काटोल विधानसभा जि.प. प्राथ. शिक्षक आघाडीतर्फे डॉक्टर डेनिमित्त कोविड सेंटर येथे नि:शुल्क वैद्यकीय सेवा देणारे डॉ. सचिन सदाशिव चिंचे यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के, मंथन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर बुटे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक शेषराव टाकळखेडे, संचालन राजेंद्र टेकाडे, मानपत्र वाचन वीरेंद्र वाघमारे तर आभार मनोहर पठाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील ठाकरे, दिलीप वरोकर, संजय ताथोडे, गिरीश उईके, तुळशीदास फुटाणे, श्रीकृष्ण भोयर, रमेश गाढवे, मोरेश्वर साबळे, प्रवीण झुराव, पांडुरंग भिंगारे, विजय धवड, सिद्धार्थ लांडगे आदींनी सहकार्य केले.

020721\img-20210702-wa0165.jpg

फोटो डॉक्टर डे निमित्याने कोरोना काळात रुग्णांना कोविड सेंटर वर रुग्णांना वर मोफत उपचार करणाऱ्या सत्कार मूर्ती डॉ सचिन चिंचे यांचा सत्कार करतांना उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर

Web Title: A doctor is a relationship of trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.