‘डॉक्टर टेल मी अबाऊट थायरॉईड’
By admin | Published: June 29, 2017 02:35 AM2017-06-29T02:35:51+5:302017-06-29T02:35:51+5:30
दिवसेंदिवस थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केवळ महिलाच नाहीत तर पुरुषही या आजाराने त्रस्त आहेत.
लोकमत सखी मंच आणि अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :दिवसेंदिवस थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केवळ महिलाच नाहीत तर पुरुषही या आजाराने त्रस्त आहेत. अनेक प्रकारच्या शंका आणि प्रश्न या आजाराबाबत नागरिकांच्या मनात असतात. या आजाराचे काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी विस्तृत मार्गदर्शन, चर्चासत्र, नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे, शंकेचे समाधान आणि उपचार यासाठी आरोग्याशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन २ जुलैला दुपारी ३ वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच आणि अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सतर्फे आयोजित या कार्यक्रमात थायरॉईडचा आजार कसे गंभीर स्वरुप घेऊ शकतो आणि त्यावर उपचार काय आहेत, या विषयावर नामवंत डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात डॉ. नलिनी शहा, डॉ. रवींद्र शुक्ला, डॉ. मनोज चढ्ढा, डॉ. डी. व्ही. देशपांडे, डॉ. सुनील आंबुलकर, डॉ. शैलेश पितळे आणि डॉ. संजय नायडू सहभागी होणार आहेत. थायरॉईडबाबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जर कुणाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी एसएमएसच्या माध्यमातून आपले प्रश्न मोबाईल क्रमांक ९८५०३०४०३७ यावर पाठवावे. कार्यक्रमात त्वरित प्रवेश मिळणार नाही. कार्यक्रमापूर्वी आधी नोंदणी करणाऱ्या ३०० महिलांसाठी हा कार्यक्रम आहे. त्यासाठी ९९२२९६८५२६, ९८८१७४८७९० या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.