‘डॉक्टर मला बोलायचं आहे’; राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:14 AM2020-04-03T11:14:55+5:302020-04-03T11:15:16+5:30
कोरोनाविषयक बातम्या, सोशल मीडियावर येत असलेली माहिती, यामुळे लोकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळाने ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ ही अभिनव योजना सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात १९ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. घराबाहेर पडणे अनेकांनी टाळले आहे. या आजारावर प्रभावी उपचार किंवा प्रतिबंधात्मक औषध नाही. यातच कोरोनाविषयक बातम्या, सोशल मीडियावर येत असलेली माहिती, यामुळे लोकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. यावर उपाय म्हणून सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळाने ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. आरोग्य सेवा, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. यावर लोकांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूरचे ३३ नामांकित मानसोपचारतज्ज्ञ समोर आले आहेत. संबंधित डॉक्टरांना त्यांनी दिलेल्या वेळेत मोबाईलवर संपर्क साधता येईल. आपल्या मनातील भीती व त्यामुळे उद्भवणारे तणाव यावर ते मार्गदर्शन करतील. डॉक्टरांची ही सेवा विनामूल्य असल्याचे डॉ. जयस्वाल म्हणाले.
वेळ डॉक्टरांचे नाव मोबाईल क्र. सकाळी ९ ते १० डॉ. विवेक किरपेकर ९८२२२००६८९ डॉ. अनघा सिन्हा ७३८७४४१६३० १० ते ११ डॉ. निखिल पांडे ८०८७५१३६२७ डॉ. राहुल बगल ९१५८०६७१६२ दुपारी १२ ते १ डॉ. रवी ढवळे ९९६०९५८५८२ डॉ. आनंद लाडे ९७३०४४८५३३१ ते २ डॉ. प्रतीम चांडक ९७६६५४७११९ डॉ. एन.जे. सावजी ९७६३२०७०१९ २ ते ३ डॉ. श्रेयस मागिया ७७२००६७५८१ डॉ. राज पलसोळकर ९४२२१२५२३५ ३ ते ४ डॉ. सुलेमान विरानी ९९२३२२८१२१ डॉ. श्रीकांत निंभोरकर ७४९९१४९६१२ डॉ. कुमार कांबळे ७५५८४८३४६७ डॉ. दर्गा बंग ९४२२८०२५३० डॉ. प्रवीर वºहाडकर ९७३०८१८११४४ ते ५ डॉ. सागर चिद्दरवार ९६५७०१८१६५ डॉ. दीपक अवचट ७७१०९१५४६५ डॉ. आशिष कुथे ७९७२५६७७२१ डॉ.विकास भुते ७०६६०४४४१० डॉ. राजेश्री निंबाळकर ८८०६६५०२२७ सायंकाळी ५ ते ६ डॉ. अक्षय सरोदे ८६९८६४७४६९ डॉ. प्रिया माधवी ९८३४९३०९४४ डॉ. मोसम फिरके ८०८७२५३११९ डॉ. पंकज बागडे ७०५७६०७५१७६ ते ७ डॉ. प्रदीप पाटील ८९९९२४८९७९ डॉ. आभा बंग ०७१२२४२६२९७ डॉ. दीपा सांगोळकर ८८५०१०१८३९ डॉ. अभिजीत फाये ९७६५२६६१६६ रात्री ७ ते ८ डॉ. सुधीर भावे ९८२२६९५८९० डॉ. साकीत ९६५७५५५६४४ ८ ते ९ डॉ. राजेश राठी ९८६०४८६२७६ डॉ. सुशील गावंडे ७३५०२७९५६४ डॉ. मोनिषा दास ९३२५३५७१५२.