डॉक्टर तुम्हीसुद्धा! आंघोळ करताना तिचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:49 AM2023-07-16T07:49:13+5:302023-07-16T07:49:28+5:30
‘मार्ड’ वसतिगृहात महिला आणि पुरुष दोघांचीही निवासाची सोय आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या ‘मार्ड’ वसतिगृहात आंघोळ करीत असलेल्या एका डॉक्टर महिलेचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या निवासी डॉक्टरला पकडून पोलिसांच्या हवाली केले. मेडिकल प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहा सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली आहे.
‘मार्ड’ वसतिगृहात महिला आणि पुरुष दोघांचीही निवासाची सोय आहे. गुरुवारी रात्री द्वितीय वर्षाला असलेली महिला डॉक्टर आंघोळीला गेली. प्रसाधनगृहातील दरवाजे खालून तुटलेले आहेत. एक निवासी डॉक्टर मोबाइलने व्हिडीओ शूटिंग करीत असल्याचे आढळले. आरडाओरड केल्यावर तो पळून गेला.