डॉक्टरांच्या प्रकरणाचे ‘आॅपरेशन’ होईना
By admin | Published: March 22, 2016 02:42 AM2016-03-22T02:42:44+5:302016-03-22T02:42:44+5:30
पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी केलेली फसवणूक तसेच छळाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागावेत...?
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी केलेली फसवणूक तसेच छळाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागावेत...? चार दिवस, आठवडा, महिना...? छे... आठ महिने झालेत. मात्र अद्याप संबंधित व्यक्तीची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे, तक्रारकर्ते कुणी सर्वसामान्य, निरक्षर नाहीत. वैद्यकीय व्यवसाय करणारे प्रतिष्ठित आहेत. तरीसुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी या प्रकरणाचे केसपेपर या पोलीस ठण्याच्या टेबलवरून त्या ठाण्याच्या टेबलवर पाठवले जात आहेत. पोलिसांच्या टाळाटाळीचे हे अफलातून उदाहरण कमालीचे संतापजनक आहे.
लब्धप्रतिष्ठित आणि मितभाषी घराण्यातील तरुणाचे लग्न २००४ मध्ये झाले. हे लग्न होण्यापूर्वी लग्नाचा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या वधूच्या नातेवाईकांनी मुलीचे आधीसुद्धा लग्न झाले होते, ती माहिती लपवून ठेवली. तिला एक वेगळा आजार आहे अन् आणखीही बरेच काही आहे, त्याचीसुद्धा माहिती दिली नाही. लग्न झाल्यानंतर महिनाभरातच ‘जुने प्रकरण’ लक्षात आल्यामुळे ‘डॉक्टर’ने तिची समजूत काढली. झाले गेले विसरून जा, असा सल्लाही दिला. तेवढ्यापुरता होकार दिल्यानंतर पुन्हा दोन-चार महिन्यानंतर तसेच सुरू झाले.
मुख्यमंत्र्यांचेही
आदेश दुर्लक्षित
४तक्रारकर्त्याला पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात सर्वसामान्यांच्या हिताचा आदेश जारी केला. त्यानुसार, कुठेही गुन्हा घडो, तक्रारदाराने दिलेली तक्रार पोलिसांनी दाखल करावी अन् नंतर हे प्रकरण चौकशीसाठी संबंधित ठाण्यात पाठवावे, असे या आदेशात सुचविण्यात आले होते. वृत्तपत्रातून तशा बातम्याही प्रकाशित झाल्या. मात्र, राज्याच्या गृहविभागाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेशही दुर्लक्षित झाल्याचे या प्रकरणातून दिसत आहे.