संपूर्ण जग लसीच्या स्वागतासाठी सज्ज असताना लसीबाबत डॉक्टर 'सावध'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 07:00 AM2020-12-11T07:00:00+5:302020-12-11T07:00:05+5:30

corona Nagpur News कोरोना लसीच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज असले तरी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणविले जाणारे सगळे डॉक्टर मात्र ती घ्यायला तयार नाहीत. नागपूरमधील प्रमुख हॉस्पिटल तसेच ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांपैकी जवळपास ४० टक्के डॉक्टरांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात ही लस घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

Doctors 'cautious' about vaccines as the whole world is ready to welcome vaccines | संपूर्ण जग लसीच्या स्वागतासाठी सज्ज असताना लसीबाबत डॉक्टर 'सावध'

संपूर्ण जग लसीच्या स्वागतासाठी सज्ज असताना लसीबाबत डॉक्टर 'सावध'

Next
ठळक मुद्दे४० टक्के डाॅक्टरांचा नकार तर, ६० टक्क्यांचा होकारनागपुरातील मोठ्या इस्पितळांतील डॉक्टरांसह आयएमएच्या सदस्यांचे वैयक्तिक मत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना लसीच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज असले तरी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणविले जाणारे सगळे डॉक्टर मात्र ती घ्यायला तयार नाहीत. नागपूरमधील प्रमुख हॉस्पिटल तसेच ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांपैकी जवळपास ४० टक्के डॉक्टरांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात ही लस घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ६० टक्के डॉक्टर मात्र ‘आयसीएमआर’ लस निर्मिती व वितरणाचे काम करीत असल्याच्या मुद्यावर लस घेण्यास तयार आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी देश-विदेशात मिळून एकूण ३० वेगवेगळ्या लसी चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यात भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा मानवी चाचणीचा पहिला व दुसरा टप्पा नागपुरात झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जात अहे. पुण्याचा ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा ‘कोविशिल्ड’ लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू आहे. ५० स्वयंसेवकांना दोन डोज देण्यात आले आहे. या दोन लसीसोबतच ‘फायझर’, ‘झायडस बायोटेक कंपनी’चे ‘झायकोव-डी’ व डॉ. रेड्डी लॅबची रशियन ‘स्पुटनिक’ लस भारतात येण्याची शक्यता आहे. परंतु या लसींबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. ‘लोकमत’ने या बाबत शहरातील मोठ्या इस्पितळांमधील डॉक्टरांसह ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेचा सदस्यांचे वैयक्तिक मत जाणून घेतले असता, ४० डॉक्टरांमधून २५ डॉक्टरांनी प्रतिबंधक लस घेण्यास होकार दिला आहे तर १५ डॉक्टरांनी नकार दिला आहे.

-लसीच्या गुणवत्तेबाबत साशंक वातावरण

लस घेण्यास नकार देणारे डॉक्टर म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी फार कमी कालावधीची आहे. या चाचण्या १० पेक्षा कमी महिन्यातील आहेत. काही डॉक्टर म्हणाले, घाईघाईत विकसित केलेली ही लस आहे. लसीच्या गुणवत्तेबाबत अद्यापही साशंक वातावरण आहे. रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोविड होऊन अ‍ॅण्टिबॉडिज वाढल्या आहेत. अ‍ॅण्टिबॉडिज वाढविण्यासाठी इतरही लस असल्याने ही लस घेणार नाही.

- लसीबाबत संपूर्ण खात्री

लस घेण्यास होकार देणारे डॉक्टर म्हणाले की, भारतात दिली जाणारी लस ‘आयसीएमआर’ने तपासली असणार आहे. त्याची योग्यता पडताळूनच नागरिकांना दिली जाणार आहे. यामुळे ती खात्रीलायक असणार आहे. कोरोनावर औषधोपचार नाही. यामुळे लस घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

-ही आहेत नकार देण्यामागील पाच कारणे

१) कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी फार कमी कालावधीची

२) घाईघाईत विकसित केलेली लस

३) लसीच्या गुणवत्तेबाबत अद्यापही साशंक वातावरण

४) कोविड झाल्याने वाढलेल्या अ‍ॅण्टिबॉडिज

५) रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी इतर लसीचा वापर

 

-ही आहेत होकार देण्यामागील पाच कारणे

१) ‘आयसीएमआर’कडून तपासणी करून लस दिली जाणार

२) लसीची नियमानुसार मानवी चाचणी

३) लसीचा उपयोग सिद्ध झाला आहे

४) लस घेतल्याने संसर्गाचा प्रसार होणार नाही

५) कोरोनावर औषधोपचार नाही, यामुळे लसीशिवाय पर्याय नाही

Web Title: Doctors 'cautious' about vaccines as the whole world is ready to welcome vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.