उपराजधानीत डॉक्टरांचा आज ‘व्हाईट अलर्ट’; उद्या ‘ब्लॅक अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 09:38 AM2020-04-22T09:38:22+5:302020-04-22T09:39:51+5:30
कोरोनाच्या काळात ‘फ्रंटलाइनवर’ काम करणाऱ्या डॉक्टरांवर देश•ारात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्व•ाूमीवर २२ एप्रिल रोजी 'व्हाईट अलर्ट' तर २३ एप्रिल रोजी ‘ब्लॅक अलर्ट’ पाळला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या काळात ‘फ्रंटलाइनवर’ काम करणाऱ्या डॉक्टरांवर देशभरात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी 'व्हाईट अलर्ट' तर २३ एप्रिल रोजी ‘ब्लॅक अलर्ट’ पाळला जाणार आहे.
‘आयएमए’ नागपूर शाखेच्या सचिव डॉ. मंजूषा गिरी यांनी सांगितले, कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर जिवापाड प्रयत्न करत आहेत. तरीही डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि समाजाकडून त्यांची होणारी वंचना थांबलेली नाही. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाºया, ‘आयएमए’ सदस्य डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी, या ऑथोर्पेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्टरांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्टरांच्या अंत्यसंस्कारामध्ये तेथील स्थानिक लोकांनी अडथळा आणला. अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्टरांच्या शोकाकुल परिवारावर अमानुष हल्ला केला. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या मृतदेहाबाबत अत्यंत अशोभनीय, असंस्कृत आणि अमानवी वर्तन तेथील समाजकंटकांनी केले. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत झाली. याचा ‘आयएमए’ निषेध व्यक्त करते. म्हणून डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचार विरोधी केंद्रीय कायदा व्हावा, या मागणीसाठी आम्ही बुधवार २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आयएमएचे सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवतील व राष्ट्राला पांढरा इशारा म्हणजे ‘व्हाईट अलर्ट’ देतील. या आंदोलनानंतरही डॉक्टर आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार कायदा करण्यास सरकार अपयशी ठरल्यास. आयएमए गुरुवार २३ एप्रिल रोजी काळा दिवस म्हणजे ‘ब्लॅक अलर्ट’ म्हणून जाहीर करेल. या दिवशी देशातील सर्व डॉक्टर काळी फीत लावून आपले काम करतील. काळा दिवसानंतरही शासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर त्या पुढील पावले उचलणारे निर्णय घेतले जातील.