गरीब मुलांना गणवेश देता की जाता?

By admin | Published: July 17, 2017 02:44 AM2017-07-17T02:44:57+5:302017-07-17T02:44:57+5:30

‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देत महापालिकेत भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे.

Does the child give uniform to the poor? | गरीब मुलांना गणवेश देता की जाता?

गरीब मुलांना गणवेश देता की जाता?

Next

विरोधी पक्षाचा महापौरांना सवाल ?
गणेश हुड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देत महापालिकेत भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे. मात्र शाळा सुरु होऊन २० दिवस झाले तरी गरिब विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने आता महापौरांसह सत्तापक्षाचा क्लास घेण्याचा संकल्प विरोधीपक्षाने केला आहे. सरकारच्या जटील नियमामुळे गणवेश वाटपात अडचणी निर्माण झाल्याचे महापौर आणि मनपा प्रशासन सांगत असले तरी ही समस्या सोडविण्यासाठी महापौर पुढाकार कधी घेणार, असा सवालही विरोधकांनी केला आहे.
इकडे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी नियोजन केल्याचा दावा महापालिकेच्या शिक्षण विभागाने केला आहे. मात्र गणवेश वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा अद्यापही विचार करण्यात आलेला नाही. इतकेच काय तर शिक्षण विभागाच्या बैठकीत महापौरांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली आहे.
दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करण्यात येत होते. विलंब झाला तरी एक दोन आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळत होता. यावर्षी शाळा सुरू होऊ न २० दिवस झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. कधी मिळणार याची शाश्वती नाही. गणवेश वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर ढकलून शिक्षण विभागाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही.
वास्तविक शाळा सुरू होण्यापूर्वीच गणवेश वाटपाचे नियोजन करण्याची गरज होती. महापालिक ा शाळांतील १८ ते २० हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी गणवेश उपलब्ध होतील, अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पालकांनी गणवेश खरेदी केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा क रण्यात येणार असल्याचा

शिक्षक सभापती तरीही...
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत चालावा, विभागाच्या अडचणी तातडीने सोडता याव्यात, यासाठी शिक्षण समितीची जबाबदारी शिक्षक असलेले दिलीप दिवे यांच्यावर सोपविण्यात आली. परंतु शिक्षक सभापती असूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या विविध समस्या तशाच कायम आहेत. शाळांत सुविधांचा अभाव आहे. शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी रखडलेली आहे.

Web Title: Does the child give uniform to the poor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.