दोहा-नागपूर चार्टर फ्लाईट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:56 PM2020-08-18T22:56:21+5:302020-08-18T22:57:55+5:30

एअर बबल करारानुसार दोहा ते नागपूर ही नियोजित फ्लाईट सेवा संचालित केली जाणार होती. ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कतारवरून चार्टर फ्लाईट प्रवासी घेऊन येणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. सध्या दोहा ते नागपूरसाठी येणाऱ्या अशा सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत.

Doha-Nagpur charter flight canceled | दोहा-नागपूर चार्टर फ्लाईट रद्द

दोहा-नागपूर चार्टर फ्लाईट रद्द

Next
ठळक मुद्दे१८ ते ३१ ऑगस्टपर्यंत उड्डाणाचे होते नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर बबल करारानुसार दोहा ते नागपूर ही नियोजित फ्लाईट सेवा संचालित केली जाणार होती. ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कतारवरून चार्टर फ्लाईट प्रवासी घेऊन येणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. सध्या दोहा ते नागपूरसाठी येणाऱ्या अशा सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दोहा ते नागपूर फ्लाईटचे नियोजन करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, काही एअरलाईन्सला परवानगी मिळालेली नाही. खाडी देशामध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त आहेत. कुवेतमध्येसद्धा भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत. ते सर्वजण भारतामध्ये परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये नागपूरहून संचालित होणाऱ्या कतार एअरवेज व एअर अरेबिया ही (नागपूर-शारजाह-नागपूर) अशी फेरी असलेली पूर्वनियोजित विमानसेवा कधी पूर्ववत होणार, याबद्दल कसलीही निश्चितता नाही.

पुणे, मुंबई फ्लाईट झाली रद्द
मंगळवारी इंडिगोची पुणे व गोबएअरची मुंबई फ्लाईट रद्द झाली. इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट ६ई ६२१६/६२१७ पुणे-नागपूर-पुणे सायंकाळी ७.३० वाजता नागपुरात पोहचते व रात्री ८.३५ वाजता पुण्याला रवाना होते. एअरलाईन्सकडून सांगण्यात आले की, उड्डाण रद्द झाल्यासंदर्भातील सूचना प्रवाशांना देण्यात आली होती. ही वेळेवर रद्द झाली नाही. त्याचबरोबर नागपूर-मुंबई-नागपूर गो-एअरची फ्लाईटसुद्धा रद्द झाली. गो-एअरची फ्लाईट रद्द होणे नवीन नाही. सूत्रानुसार गो-एअर आता संकटात आहे. गो-एअरचे क्रेडिट संपलेले आहे. त्यामुळे कॅश अ‍ॅण्ड क्रेडिटवर चालविण्यास सांगितले आहे.

Web Title: Doha-Nagpur charter flight canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.