घरगुती गॅस महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:45+5:302021-02-26T04:11:45+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : केंद्र शासनाने माेठा गाजावाजा करीत उज्ज्वला गॅस याेजना सुरू केली. प्रत्येकांना गॅस सिलिंडरचा वापर ...

Domestic gas became more expensive | घरगुती गॅस महागला

घरगुती गॅस महागला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : केंद्र शासनाने माेठा गाजावाजा करीत उज्ज्वला गॅस याेजना सुरू केली. प्रत्येकांना गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाकासाठी लाकूड व राॅकेलचा वापर टाळण्याचे आवाहनही केले. परंतु घरगुती वापरातील गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद केल्यानंतर गॅसच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी, गाेरगरिबांचा स्वयंपाक आता गॅसवरून चुलीवर हाेण्याच्या मार्गावर आहे.

कळमेश्वर शहरासह तालुक्यात घरगुती ग्राहकांची संख्या ३० हजार ८१९ तर उज्ज्वला गॅसचे ग्राहक २,६०० इतकी आहे. जानेवारी महिन्यात ७४६ रुपयात मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत टप्प्याटप्याने वाढ करीत आता गॅसचे दर ८४६ रुपये झाले आहे. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाकडे गॅस सिलिंडर पाेहाेचला. मात्र भरमसाट वाढलेल्या किमतीमुळे गॅसचा वापर केवळ चहापुरता करावा लागत आहे. अशीच दरवाढ हाेत राहिल्यास संपूर्ण स्वयंपाक चुलीवर करावा लागणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातील गृहिणींनी दिल्या.

काेराेनामुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती बिघडली आहे. बाजारपेठा, व्यवसाय सुरळीत झाले नाही, ताेच काेराेनाने पुन्हा डाेके वर काढल्याने अनेकांचे राेजगार बंद हाेण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच महागाई वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित काेलमडले आहे. गॅस सिलिंडरमध्ये झालेल्या दरवाढीचा सामान्यांना एकप्रकारे दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी करावे, अशी मागणी गृहिणींसह नागरिकांनी केली आहे.

....

गॅस सिलिंडरचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. आधीच काेराेनामुळे छाेटे व्यवसाय बुडाले, अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. पाेट भरण्यासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी माेलमजुरी करून अनेकांची धडपड सुरू आहे. असे असताना दिवसेंदिवस वाढत असलेली दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे माेडणारी ठरत आहे. त्यामुळे शासनाने हे दर कमी करावे.

- वंदना लाेणकर, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी शिवसेना.

Web Title: Domestic gas became more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.