मनाप्रमाणे दान करा, गणेशमूर्ती घेऊन जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:28+5:302021-09-10T04:11:28+5:30
नागपूर : गणेशाेत्सवाच्या काळात गणेशमूर्तींना मागणी असते. भाविक आपल्या शक्यतेप्रमाणे गणेशमूर्तींची खरेदी करून घरी स्थापना करीत असतात. महालमधील एका ...
नागपूर : गणेशाेत्सवाच्या काळात गणेशमूर्तींना मागणी असते. भाविक आपल्या शक्यतेप्रमाणे गणेशमूर्तींची खरेदी करून घरी स्थापना करीत असतात. महालमधील एका कापड व्यावसायिकाने ग्राहक भाविकांसाठी अनाेखा उपक्रम चालविला आहे. दानपेटीमध्ये मनाप्रमाणे दान करून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती घरी नेण्याची संधी दुकानदाराने उपलब्ध केली आहे.
शिवाजी पुतळा ते गांधीसागर तलाव राेडवरील या कापड व्यावसायिकाने दुकानामध्ये लहान मूर्तींचे प्रदर्शन लावले आहे. मात्र, या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या नाहीत. भाविकांनी एक रुपयापासून यथाशक्ती कितीही दान करावे, त्यांना ही मूर्ती दिली जात आहे. दुकानमालक नरेंद्र वनवानी यांनी सांगितले की, या मूर्ती अनाथाश्रमाच्या मुलांनीच तयार केल्या आहेत. त्या संपूर्णपणे मातीच्या असून, पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाचे हाेणारे प्रदूषण राेखण्यासाठी या पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्याचे वनवानी यांनी सांगितले. दानरूपात गाेळा हाेणारा निधी पुढे अनाथाश्रमातील मुलांच्या मदतीसाठीच दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशाेत्सवात एक सामाजिक कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.