घाबरू नका, पण काळजी घ्या: माजी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:16 AM2020-05-15T00:16:11+5:302020-05-15T00:20:27+5:30
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन व्हिडीओ कॉलिंगद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णाच्य प्रकृतीची आस्थेने चौकशी केली, घाबरू नका पण काळजी घ्या, डॉक्टर सांगतील तसे वागा, अस सल्लाही दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन व्हिडीओ कॉलिंगद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णाच्य प्रकृतीची आस्थेने चौकशी केली, घाबरू नका पण काळजी घ्या, डॉक्टर सांगतील तसे वागा, अस सल्लाही दिला. फडणवीस यांनी पुढील दोन दिवसात रुग्णसेवेत सुरू होणाऱ्या अतिदक्षता विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. सोबतच डॉक्टरांच्या कार्याचे कौतुकही केले.
फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी १.३०वाजता मेडिकलला भेट दिली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या कक्षात त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. तीन वर्षांपूवी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे आताचे कोविड हॉस्पिटलमधून दिल्या जाणाºया सेवेची माहिती घेतली. येथील रुग्णसेवेच्या नियोजनावर त्यांनी समाधान व्यक्त केले. याच दरम्यान त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांशी मोबाईलच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. कसे आहात, काही समस्या आहे का, असे प्रश्न विचारून काळजी घेण्याचे व डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वागण्याचा सल्लाही दिला. लहान मुलगा, पुरुष व एका रुग्ण महिलेशी संवाद साधला. यानंतर फडणवीस यांनी तकिया जिमखाना आणि जयताळ्यातील एकात्मतानगर येथे सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनलाही भेट देऊन पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी सुमारे दीड महिन्यापासून दररोज दोन हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. यावेळी आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, किशोर वानखेडे, पारेंद्र पटले, लखन येरावार, आशिष पाठक उपस्थित होते.