लाचखोर मानेना । नोटाबंदी अन् लॉकडाऊनमध्येही लाचखोरी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:14+5:302021-08-01T04:07:14+5:30

नागपूर - नोटाबंदीने देशभरात अक्षरशा अनेक व्यवहार ठप्प झाले. कित्येकांचे रोजगार गेले अन् कित्येक उद्योग-व्यवसाय डबघाईस आले. त्यानंतर कोरोनामुळे ...

Don't be considered a bribe taker. Bribery is rampant even in denomination unlockdown | लाचखोर मानेना । नोटाबंदी अन् लॉकडाऊनमध्येही लाचखोरी जोरात

लाचखोर मानेना । नोटाबंदी अन् लॉकडाऊनमध्येही लाचखोरी जोरात

Next

नागपूर - नोटाबंदीने देशभरात अक्षरशा अनेक व्यवहार ठप्प झाले. कित्येकांचे रोजगार गेले अन् कित्येक उद्योग-व्यवसाय डबघाईस आले. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लावावे लागल्याने सारे जगच हवालदिल झाले. सर्वच थांबल्यासारखे थांबले. मात्र, या दोन्ही घडामोडींचा कवडीचा परिणाम लाचखोरांवर झाला नाही. ते आधीही जोरात होते अन् आताही जोरात आहेत. होय, लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड वर्षांत लाचखोरीची थोडीथोडकी नव्हे, तब्बल ११४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात २०२० ची ७२ आणि यावर्षी जुलैपर्यंत ४२ लाचखोरीच्या प्रकरणांचा समावेश आहे.

----

वर्ष - लाच प्रकरणे २०१६ - १३५

२०१७. - ११०

२०१८. - १२१

२०१९. - १११

२०२० - ०७२

२०२१ (जुलैपर्यंत)- ४२

---

लाचखोरीत महसूल विभाग अव्वलस्थानी

यावर्षी लाचखोरीत महसूल विभाग अव्वलस्थानी असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ४२ प्रकरणांपैकी लाच मागितल्याचे आणि स्वीकारल्याचे ९ प्रकरणे महसूल विभागात घडली. त्यापाठोपाठ सात प्रकरणे पोलीस विभागातील आहेत.

-----

लाच दोनशेपासून दोन लाखांपर्यंत...

१) लाखोंचे जुने बिल मंजूर केले अन् आता परत नवीन बिल मंजूर करायचे आहे म्हणून जिल्हा परिषद नागपूरच्या पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता असलेला विजय क्रिष्णूजी टाकळीकर (वय ५५) याने एका कंत्राटदाराला चक्क ६ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याच्यावतीने दोन लाखाचा पहिला लाचेचा हप्ता स्वीकारताना टाकळीकरचा वाहनचालक जयेंद्र विठोबाजी रेवतकर (वय ६२) याला एसीबीच्या पथकाने २६ जून २०२० ला रंगेहात पकडले होते.

----

२) केवळ २०० रुपयांची लाच

मार्च २०२० मध्ये गोंदिया नगर परिषदेत कार्यरत असलेले तत्कालीन लिपीक शरद भाऊराव बोरकर (वय ४४) यांनी वारसा हक्काचे नाव नोंदवण्यासाठी २०० रुपयांची लाच मागितली होती. केवळ २०० रुपयांसाठी बोरकरने लाचखोरीच्या आरोपात स्वत:ची नोकरी, प्रतिष्ठा गमावली.

---

((कोट))

लाचेसाठी चटावल्यांमुळे अनेक चांगले अधिकारी, कर्मचारी अन् त्यांचा तो विभागही बदनाम होतो. हे लाचखोर समाजाच्या प्रगतीला लागलेली उधळी आहे. त्यांना कायदेशीर धडा शिकविणे गरजेचे आहे. त्यामुळे कुणीही लाचेची मागणी केली तर एसीबीच्या कार्यालयात संपर्क करावा. आपण सगळे मिळून समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करूया ।

रश्मी नांदेडकर

एसपी, एसीबी, नागपूर ।

Web Title: Don't be considered a bribe taker. Bribery is rampant even in denomination unlockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.