दया आणि न्याय यांच्यात गफलत नको, सरन्यायाधीशांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:44 AM2023-02-12T10:44:36+5:302023-02-12T10:45:57+5:30

सरन्यायाधीश चंद्रचूड : विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ

Don't confuse mercy and justice, says Chief Justice d.y. chandrachude | दया आणि न्याय यांच्यात गफलत नको, सरन्यायाधीशांची स्पष्टोक्ती

दया आणि न्याय यांच्यात गफलत नको, सरन्यायाधीशांची स्पष्टोक्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायामुळे समाज हा सक्षम आणि स्वयंपूर्ण होतो, तर दयेमुळे केवळ काही क्षणासाठी अन्यायाचे दुःख दूर होते. केवळ दयादानाचे काम न करता न्यायदानाला अनुकूल असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करताना न्यायाची दयेसोबत गफलत करू नये, असे आवाहन करीत भारताचे सरन्यायाधीश न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी ‘दया आणि न्याय’ यांच्यातील फरक शनिवारी येथे अधोरेखित केला.

नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. वारंगा, बुटीबाेरी येथील  विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात आयाेजित या दीक्षांत समारंभाला देशाचे माजी सरन्यायाधीश व विद्यापीठाचे संस्थापक कुलपती न्या. शरद बोबडे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या. भूषण गवई, आदी मान्यावर उपस्थित होते.
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या दस्तऐवजामध्ये  परिवर्तनात्मक क्षमता असून,  संविधानाच्या प्रास्ताविकेत संविधानाचे तत्त्व अंगीकृत केलेले आहेत. त्यामुळे आपण विधिज्ञ म्हणून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन घेतले पाहिजे. 

संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करा
कायदा आणि समाजाला न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मूल्यांसह पुढाकार घेणे आवश्यक आहे. विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा, त्यामुळे त्यांंना कधीच अपयश येणार नाही, असेही प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी येथे केले.

Web Title: Don't confuse mercy and justice, says Chief Justice d.y. chandrachude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.