दीक्षाभूमीवर गर्दी करू नका, घरीच राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:08 AM2020-12-06T04:08:29+5:302020-12-06T04:08:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे संकट लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर गर्दी ...

Don't crowd the initiation ground, stay at home | दीक्षाभूमीवर गर्दी करू नका, घरीच राहा

दीक्षाभूमीवर गर्दी करू नका, घरीच राहा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर गर्दी करू नका. आपापल्या घरी, विहारांमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करा, आपली व इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे साधेपणाने अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यात सर्व पदाधिकारी व सदस्य हे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. अभिवादनाचा कार्यक्रम हा दीक्षाभूमी यू.ट्यूब चॅनेलवर सर्वांना पाहता येईल. तेव्हा सर्वांनी आपली व इतरांची काळजी घ्यावी, आणि आपापल्या घरी व विहारांमध्येच बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करावी, अशी विनंती गजघाटे यांनी केली आहे.

Web Title: Don't crowd the initiation ground, stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.