झाडे तोडून श्वास गुदमरण्याची पाळी येऊ देऊ नका ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:26+5:302021-06-03T04:07:26+5:30

एनएचएआयच्या मागणीनुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने आयएमएससाठी ४,९३० झाडे ताेडण्याबाबत नाेटीस प्रकाशित करून सात दिवसात आक्षेप मागविले आहेत. वृक्षप्रेमी नागरिकही ...

Don't cut down trees and suffocate () | झाडे तोडून श्वास गुदमरण्याची पाळी येऊ देऊ नका ()

झाडे तोडून श्वास गुदमरण्याची पाळी येऊ देऊ नका ()

Next

एनएचएआयच्या मागणीनुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने आयएमएससाठी ४,९३० झाडे ताेडण्याबाबत नाेटीस प्रकाशित करून सात दिवसात आक्षेप मागविले आहेत. वृक्षप्रेमी नागरिकही आक्षेप नाेंदविण्यासाठी सरसावले आहेत. अजनीवन बचाव माेहीम राबविणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजनी परिसरात स्वाक्षरी अभियान राबविले. १५०० च्यावर नागरिकांनी वृक्षताेडीविराेधात मत नाेंदविले. जाेसेफ जाॅर्ज, कुणाल माैर्य, राेहन या सक्रिय कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात अभियान राबविले गेले. त्यानंतर काेराेना नियमांचे पालन करीत नागरिकांच्या स्वाक्षरीसह आक्षेपपत्र मनपाच्या उद्यान विभागास सादर करण्यात आले.

सिटीझन फाेरमतर्फे ५०० वृक्षपेमींचे आक्षेपपत्र

दुसरीकडे इतर संघटनांनीही अजनीवनातील वृक्षताेडीविराेधात आवाज उठविला आहे. फाेरमच्या सदस्यांनी बुधवारी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ५०० नागरिकांच्या स्वाक्षरीसह आक्षेपाचे लेखी निवेदन सुपूर्द केले. याप्रसंगी अभिजित झा, अमित बांदूरकर, प्रतीक बैरागी, अभिजितसिंह चंदेल, वैभव शिंदे पाटील उपस्थित हाेते. शहरातील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेने वृक्षतोडीसाठी परवानगी देणे हे सर्वथा दुर्दैवी आहे. विरोध झुगारून वृक्षतोडीसाठी पावले उचलणे लोकविरोधी आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबतीत प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांना घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला.

१० हजार नागरिकांचे ऑनलाईन समर्थन

दरम्यान पर्यावरण कार्यकर्त्यांनी ऑनलाईन अभियान राबविले आहे. कुणाल माैर्य यांनी सांगितले, मंगळवारी ऑनलाईन स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली व दीड दिवसातच १० हजार वृक्षप्रेमींनी झाडे ताेडण्यावर आक्षेप नाेंदविला. हे समर्थन सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनपाने वाढविली आक्षेप नाेंदविण्याची मुदत

पर्यावरणप्रेमींच्या अजनीवन वाचवा अभियानाला बुधवारी अंशत: यश मिळाले. महापालिकेने वृक्षताेडीविराेधात आक्षेप नाेंदविण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचे बुधवारी जाहीर केले. ही मुदत यापूर्वी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सात दिवस म्हणजे ४ जूनपर्यंत हाेती.

विराेध शमविण्याचा गडकरींचा प्रयत्न

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करीत पुनर्वसनाच्या कामातील २,०२३ झाडे वाचविण्यासह कमी झालेल्या झाडांच्या पाचपट झाडे लावण्याचा विश्वास दिला. मात्र सर्व झाडे जाेपासण्याच्या मागणीवर वृक्षप्रेमी ठाम आहेत. एनएचएआयने सुरुवातीला १,९०० झाडे ताेडली जाणार असल्याचे सांगितले. मात्र पर्यावरणप्रेमींनी अजनीवन परिसरात ७,००० पेक्षा अधिकची वनसंपदा असल्याचे सांगितले. मनपानेही जवळपास ७,००० झाडे असल्याचे मान्य केले. आता ४,९३० झाडे निश्चित झाल्याने २,००० च्यावर झाडे वाचविण्यात आल्याचे बाेलले जाते. मात्र आयएमएसच्या कामाचा हा केवळ पहिला टप्पा असून, चार टप्प्यातील पूर्ण कामात ४० हजाराच्यावर झाडे ताेडली जाणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Web Title: Don't cut down trees and suffocate ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.