टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना बळी पडू नका, महाज्योतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 04:09 PM2023-07-03T16:09:40+5:302023-07-03T16:09:59+5:30

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क,  नागपूर : टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले ...

Don't fall for scams about locking tabs, Mahajyoti appeals | टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना बळी पडू नका, महाज्योतीचे आवाहन

टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना बळी पडू नका, महाज्योतीचे आवाहन

googlenewsNext

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांना जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षणासाठी मोफत टॅब वाटप ही माहाज्योतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत दररोज ६ जीबी डेटा देण्याचाही समावेश आहे.

२०२३ च्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षणा करीता विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरीत करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी टॅबचा वापर पुर्णत: अभ्यासाकरीता करावा यासाठी टॅबला एडमिनिस्ट्रेटिव पासवर्ड लावण्यात आला होता. ६ जून रोजी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपल्याने टॅबमधील एडमिनिस्ट्रेटिव पासवर्ड अनलॉक करण्याकरीता सबंधीत कंपनीला कळविण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबत कोणताही संभ्रम किंवा गैरसमज बाळगू नये, असे महाज्योतीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Don't fall for scams about locking tabs, Mahajyoti appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर