अनोळखी व्यक्तीला मोबाइल देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:10 AM2021-08-20T04:10:29+5:302021-08-20T04:10:29+5:30

दयानंद पाईकराव नागपूर : अनोळखी व्यक्तीने कॉल करण्यासाठी मोबाइल मागितला, तर अजिबात देऊ नका. या माध्यमातून ओटीपी मिळवून तो ...

Don't give a mobile to a stranger | अनोळखी व्यक्तीला मोबाइल देऊ नका

अनोळखी व्यक्तीला मोबाइल देऊ नका

Next

दयानंद पाईकराव

नागपूर : अनोळखी व्यक्तीने कॉल करण्यासाठी मोबाइल मागितला, तर अजिबात देऊ नका. या माध्यमातून ओटीपी मिळवून तो व्यक्ती तुमच्या खात्यातील रक्कम साफ करू शकते. अशा फसवणुकीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ओटीपी मिळविण्यासाठी अशी होऊ शकते फसवणूक

१) सायबर गुन्हेगार एक लिंक पाठवितात. तुमचे एटीएम बंद होणार असल्याची भीती दाखवितात. लिंक उघडल्यानंतर हुबेहूब बँकेचे नाव दिसते. त्यात खाते क्रमांक, कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर आदी माहिती भरावयाची असते. ही माहिती भरल्यानंतर तुमची सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाते. त्यानंतर तो तुमचे बँक खाते साफ करतो. त्यामुळे आलेल्या लिंकवर भरवसा ठेवू नये.

२) अनेकदा मोबाइलच्या केवायसी अपडेट करण्यासाठी फोनवर संपर्क साधण्यास सांगण्यात येते. तिथे फोन केल्यानंतर सायबर गुन्हेगार लिंकद्वारे एनी डेस्क, टीम व्हिवर आदी ॲप डाऊनलोड करायला लावून ओटीपी कोड घेऊन तुमच्या मोबाइलचा ताबा घेतात. त्यानंतर फोनमधील वॉलेटवरून तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतात.

३) सायबर गुन्हेगार लॉटरी लागल्याचा मॅसेज पाठवितात. त्यानंतर लिंक पाठवून त्यात माहिती भरायला लावतात. माहिती भरल्यानंतर ते तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मागतात. ओटीपी देताच काही सेकंदातच तुमच्या खात्यातील रक्कम गायब होते.

फसव्या संदेशापासून दूर राहा

‘मोबाइल, बँक खाते बंद होणार असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्यासाठी सायबर गुन्हेगार एसएमएस, कॉल करतात. एनी डेस्क, टीम व्हिवर ॲप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर ओटीपी घेऊन रुपये उडवितात. लिंकद्वारे माहिती भरण्यासाठी किंवा कोणतेही ॲप डाऊनलोड करायला सांगण्यात आल्यास अशा संदेशापासून सावध राहा. कोणतीही बँक, मोबाईल कंपनी असे करण्यास सांगत नाही. त्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. नुकसान झाल्यास बँक स्टेटमेंटसह जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा.’

-केशव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम

..........

Web Title: Don't give a mobile to a stranger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.