पाणी कर वाढवून नागरिकांना आणखी संकटात टाकू नका : महापौर जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:21 PM2020-08-07T23:21:35+5:302020-08-07T23:24:17+5:30

मनपा आयुक्त यांनी पाणी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर संदीप जोशी यांनी मात्र आयुक्तांच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नागरिक अगोदरच कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणी कर वाढवून त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकला गेला तर ते आणखी संकटात सापडतील. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत, असे महापौर जोशी यांनी म्हटले आहे.

Don't put citizens in more trouble by raising water tax: Mayor Joshi | पाणी कर वाढवून नागरिकांना आणखी संकटात टाकू नका : महापौर जोशी

पाणी कर वाढवून नागरिकांना आणखी संकटात टाकू नका : महापौर जोशी

Next
ठळक मुद्देआयुक्तांच्या निर्णयाला केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा आयुक्त यांनी पाणी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरसंदीप जोशी यांनी मात्र आयुक्तांच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नागरिक अगोदरच कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणी कर वाढवून त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकला गेला तर ते आणखी संकटात सापडतील. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत, असे महापौर जोशी यांनी म्हटले आहे. तसेच संबंधित पाणी दरवाढीचा निर्णय एक वर्षासाठी पुढे वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर करून आणण्याचा सल्लाही आयुक्तांना दिला.
मनपा आयुक्तांना पाच टक्के दरवाढीचा अधिकार आहे. ते ही दरवाढ लागू करण्याच्या तयारीत आहेत. परंतु महापौरांनी या दरवाढीला विरोध दर्शविला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नागरिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना महापालिकेची साथ मिळायला हवी. यावेळी पाणी कर वाढ वाढवला गेला तर नागरिक आर्थिकदृष्ट्या आणखी संकटात सापडतील.

Web Title: Don't put citizens in more trouble by raising water tax: Mayor Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.