गर्दी करू नका, अन्यथा कठोर निर्णय : महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 08:30 PM2020-03-18T20:30:25+5:302020-03-18T20:32:45+5:30

गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

Don't rush, otherwise tough decision: Mayor Sandeep Joshi | गर्दी करू नका, अन्यथा कठोर निर्णय : महापौर संदीप जोशी

गर्दी करू नका, अन्यथा कठोर निर्णय : महापौर संदीप जोशी

Next
ठळक मुद्देआवाहन अन् इशाराही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र आणि राज्य शासन तसेच स्थानिक यंत्रणांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात आज तिसऱ्या आठवड्यात कोरोना संसर्ग व्यक्तींची संख्या तुलनेने फार कमी आहे. मात्र, पुढील काही आठवडे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक यंत्रणेने आदेश काढलेले आहेत. यामध्ये लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौरसंदीप जोशी यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणेतर्फे आजवर केलेली कार्यवाही आणि करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात संदीप जोशी यांनी मनपा मुख्यालयात बुधवारी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी कोरोनासंदर्भात नागपूरशी संबंधित माहिती दिली.

मनपाचा नियंत्रण सज्ज
कोरोनासंदर्भात अथवा संशयिताबद्दलची माहिती देण्यासाठी महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. दूरध्वनी क्रमांक ०७१२-२२५६७०२१ असून नागरिकांनी कोरोना बाधितासंदर्भात कुठलीही माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयएमएची हेल्पलाईन
आय.एम.ए.ने सुद्धा जनतेला कोरोनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरू केली आहे. यावरून थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो. नागरिकांनी आय.एम.ए.च्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९९९६७२२३८ आणि ९९९९६७२२३९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आय.एम.ए.तर्फे करण्यात आले आहे.

मास्कची योग्य विल्हेवाट लावा
नागरिकांनी भयभीत होऊन मास्कचा वापर करु नये. वापरले तर ते योग्य प्रकारे कागदात गुंडाळून मनपाच्या स्वच्छतादूताकडे अर्थात कचरागाड्यांमध्ये द्यावे. त्यात स्वतंत्रपणे ते ठेवण्यात येईल व योग्य विल्हेवाट लावली जाईल, असे आवाहनही महापौरांनी केले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • चार कोरोना बाधितांच्या संपर्कातील ८३ जणांवर आरोग्य यंत्रणेची नजर.
  • विदेशातून येणाऱ्यांसाठी आमदार निवास येथे २४० खाटांची व्यवस्था.
  • आमदार निवासात ठेवण्यात आलेल्यांना सर्व सुविधा उपलब्ध.
  • रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता.
  • जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक खबरदारी
  • वेळ पडल्यास सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
  • अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार.
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ तातडीने रद्द करण्याचे आवाहन.

Web Title: Don't rush, otherwise tough decision: Mayor Sandeep Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.