संक्रमण थांबेना, नागरिकही ऐकेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:03+5:302021-03-05T04:09:03+5:30
सावनेर/काटोल/हिंगणा/कळमेश्वर/हिंगणा/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग कायम आहे. जिल्ह्यात गुरुवारी २२३ रुग्णांची नोंद झाली. यातील एकट्या ...
सावनेर/काटोल/हिंगणा/कळमेश्वर/हिंगणा/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग कायम आहे. जिल्ह्यात गुरुवारी २२३ रुग्णांची नोंद झाली. यातील एकट्या सावनेर तालुक्यातील ५० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्हीटीचा रेट वाढत असताना कोरोना प्रतिबंधक नियमाचे मात्र सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.
सावनेर तालुक्यात आढळलेल्या ५० रुग्णांपैकी २५ रुग्ण सावनेर शहरातील आहेत. यासोबतच दहेगाव येथे (१२), पाटणसावंगी व एमएसईबी कॉलनी (२), पिपळा, बोरुजवाडा, चनकापूर, वलनी, नांदागोमुख, खापा, बडेगाव येथेही रुग्णांची नोंद झाली आहे.
सावनेरपाठोपाठ काटोल तालुक्यात संक्रमणाचा वेग अधिक आहे. येथे २७ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात १३८ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. बाधितांमध्ये काटोल शहरातील १६ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरातील पंचवटी येथे (५), पाॅवर हाऊस (३), काळे चौक (२) तर सरस्वतीनगर, घोडे ले-आऊट, माळोदे ले-आऊट, धवड ले-आऊट, लक्ष्मीनगर, शाळा क्रमांक-२ परिसरात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी येथे (३), अंबाडा (२) तर मेंढला, मसाळा, खंडाळा, मरकसूर, नांदोरा, रिधोरा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात बाधितांच्या संख्येत काहीअंशी घट झाली आहे. नरखेड शहरात गुरुवारी पाच रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळला नाही. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७९ तर शहरातील १०४ इतकी झाली आहे. कुही तालुक्यात गुरुवारी २०१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मेंढेगाव येथील १२ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगण्यात पुन्हा २६ रुग्ण
औद्योगिक नगरी असलेल्या हिंगणा तालुक्यात कोरोनाबाधितांचा टक्का पुन्हा वाढायला लागला आहे. गुरुवारी तालुक्यात ५४३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील (११), डिगडोह व हिंगणा येथे प्रत्येकी ६, कान्होलीबारा, रायपूर व टाकळघाट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४,३१२ इतकी झाली आहे. यातील ४,००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कळमेश्वर ग्रामीणमध्ये संक्रमण अधिक
कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी १९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील ६ तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बोरगाव बु. येथे ३, कोहळी, मोहपा, मोहगाव, पिल्कापार, खुमारी, उबाळी, धापेवाडा, सोनपार, धापेवाडा बु. आणि वरोडा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
रामटेकला दिलासा
रामटेक तालुक्याला कोरोना संक्रमणापासून दिलासा मिळत आहे. गुरुवारी तालुक्यात १४३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११४० झाली आहे. यातील १०१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी दिली.