यशासाठी ‘शॉर्टकट’ वापरूनका : व्हीव्हीएस लक्ष्मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:10 AM2018-08-30T01:10:14+5:302018-08-30T01:12:31+5:30

खेळात यशस्वी होण्यासाठी समर्पितभाव, ध्यास आणि उत्कृष्ट तयारी या गोष्टींची गरज असते. ज्या खेळाडूंकडे या तिन्ही गोष्टी आहेत, तोच यशोशिखर गाठू शकतो, असे सांगून झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट मारू नका, असा मोलाचा सल्ला भारताचा महान कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने क्रिकेटपटूंना दिला.

Don't Use 'shortcut' for success: VVS Laxman | यशासाठी ‘शॉर्टकट’ वापरूनका : व्हीव्हीएस लक्ष्मण

यशासाठी ‘शॉर्टकट’ वापरूनका : व्हीव्हीएस लक्ष्मण

Next
ठळक मुद्देव्हीसीएचा वार्षिक पुरस्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: खेळात यशस्वी होण्यासाठी समर्पितभाव, ध्यास आणि उत्कृष्ट तयारी या गोष्टींची गरज असते. ज्या खेळाडूंकडे  या तिन्ही गोष्टी आहेत, तोच यशोशिखर गाठू शकतो, असे सांगून झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट मारू नका, असा मोलाचा सल्ला भारताचा महान कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने क्रिकेटपटूंना दिला.
विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे बुधवारी सिव्हील लाईन्स येथील स्टेडियममध्ये आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण उपस्थित होता. बापुना करंडकासाठी बंगाल रणजी संघासोबत आलेला लक्ष्मण विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना म्हणाला, खेळाडूने स्वप्ने नक्की पाहावीत, पण कुठलेही स्वप्न रात्रभरात पूर्ण होत नाही.
स्वप्न साकारण्यासाठी कठोर मेहनत व समर्पित भाव हवा. मैदानावर तासन्तास वेळ देण्याची तयारी हवी. खेळाप्रति प्रेम, प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा जपणारा खेळाडू आयुष्यात यशस्वी होतो.’
स्पर्धा दुसऱ्याशी नव्हे तर स्वत:शी करा, असे सांगून लक्ष्मण म्हणाला,‘ खेळाडू जेव्हा स्वत:शी स्पर्धा करतो, तेव्हा सरस कामगिरी करण्याची भूक वाढीस लागते. खेळात यशोशिखर गाठायचे असेल तर प्रामाणिक मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही.’ विदर्भाच्या विविध संघांनी गतवर्षी केलेल्या चमकदार कामगिरीचे कौतुक करून त्याने व्हीसीएचे अभिनंदन केले.
यावेळी व्हीसीएचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जैस्वाल यांनी मागील वर्ष विदभार्साठी अविस्मरणीय व स्वप्नवत राहिल्याचे सांगून, खेळाडूंना समाधानी न राहता भविष्यात आणखी चांगल्या कामगिरीसाठी मेहनत करण्याचा सल्ला दिला. उपाध्यक्ष माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांनीही कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले.
गत मोसमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व संघांना लक्ष्मणच्या हस्ते ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात रजनीश गुरबानी, आदित्य ठाकरे, आदित्य सरवटे, अथर्व तायडे, यश राठोड, कोमल झंझाड आदींचा समावेश आहे. व्हीसीएतर्फे लक्ष्मणचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तरुण पटेल यांनी संचालन केले.

Web Title: Don't Use 'shortcut' for success: VVS Laxman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.