पुण्या-मुंबईत शिक्षण नको रे बाबा...; विदर्भातील महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:13 AM2020-07-04T09:13:05+5:302020-07-04T09:13:24+5:30

मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल.

Don't want education in Pune-Mumbai, ...; 'Good day' to colleges in Vidarbha | पुण्या-मुंबईत शिक्षण नको रे बाबा...; विदर्भातील महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’

पुण्या-मुंबईत शिक्षण नको रे बाबा...; विदर्भातील महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’

Next
ठळक मुद्दे‘डीटीई’चा अंदाज

आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या नागपूर व अमरावती विभागातील अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांना यंदा दिलासा मिळू शकतो. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील अनेक महाविद्यालयांत ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. यंदा दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांची कमतरता राहणार नाही.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ‘कोरोना’चा प्रकोप लक्षात घेता ‘डीटीई’कडून हा अंदाज लावण्यात आला आहे. मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल. ‘आयआयटी’ व ‘एनआयटी’नंतर विद्यार्थी विदर्भातीलच ‘टॉप’ महाविद्यालयांत प्रवेशांवर भर देतील.
विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे मागील सहा वर्षांपासून सातत्याने अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालये बंद होत आहेत. २०१७ मध्ये विभागात ६० अभियांत्रिकी महाविद्यालये होती व तेथे २४ हजार जागा होत्या. २०१९ मध्ये ही संख्या ४७ झाली व जागा १८ हजार २४० झाल्या. २०१९-२० मध्ये स्थिती बदलू शकली नाही. विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ व ‘डीटीई’सोबत विद्यापीठालादेखील महाविद्यालय व अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविले होते. यासंदर्भात विद्यापीठाच्या समितीने प्रस्ताव मंजूर केले आहेत.

या महाविद्यालयांनी पाठविला होता प्रस्ताव
विद्यापीठाला प्रस्ताव पाठविणाºया महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग-वानाडोंगरी-नागपूर, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी-सावंगी मेघे-वर्धा, मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन यांनी महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता तर जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने ‘एमटेक’सोबतच ‘बीटेक’चे काही अभ्यासक्रम बंद करणे तसेच काहींची प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. केडीके कॉलेज ऑफ इंजिनियरिंगतर्फेदेखील काही अभ्यासक्रम बंद करणे व प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने ‘एमटेक’चा एक अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव दिला. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगनेदेखील अभ्यासक्रम बंद करणे व प्रवेश क्षमता घटविण्याचा प्रस्ताव दिला होता. मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने प्रवेश क्षमता कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता.

‘कोरोना’चा प्रभाव
‘कोरोना’च्या संसर्गामुळे विद्यार्थी पुणे व मुंबई जाण्यासंदर्भात नक्कीच विचार करतील. अशा स्थितीत नागपूर व अमरावती विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राथमिकता देण्याचा ते विचार करतील. विभागांमध्ये चांगल्या अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांची कमतरता नाही, असे मत ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक डॉ.राम निबुदे यांनी व्यक्त केल्

 

Web Title: Don't want education in Pune-Mumbai, ...; 'Good day' to colleges in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.