अन्य डॉक्टरांसोबत काम करू नका!, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’चे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 02:13 AM2020-12-20T02:13:45+5:302020-12-20T06:54:48+5:30

MMC appeals to allopathy doctors : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

Don't work with other doctors !, MMC appeals to allopathy doctors | अन्य डॉक्टरांसोबत काम करू नका!, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’चे आवाहन

अन्य डॉक्टरांसोबत काम करू नका!, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’चे आवाहन

Next

नागपूर : अ‍ॅलोपॅथी (मॉडर्न मेडिसीन) शाखेतील डॉक्टरांनी इतर पॅथीच्या डॉक्टरांसोबत सेवा देऊ नये. इतर पॅथीसोबत काम करणे हे नीतिमत्तेला धरून नाही, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या डॉक्टरांसोबत काम न करण्याचे आवाहनही ‘एमएमसी’ने केले आहे.
केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करून एक दिवसाच्या संपाचे हत्यारही उपसले. तर ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’च्या (निमा) सदस्यांनी त्या दिवशी गुलाबी रिबीन 
बांधून रुग्णसेवा दिली. परंतु हा 
वाद आता इतक्यावर थांबताना 
दिसून येत नाही. ‘एमएमसी’च्या पत्रामुळे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट १९६५ची आठवण देताना इतर पॅथीसोबत काम करणे अन्य डॉक्टरांना प्राप्त कायदेशीर अधिकारावर घाला घालणारे आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न नसणाऱ्या डॉक्टरांना 
मॉडर्न मेडिसीनची प्रॅक्टिस करता येणार नाही. यासोबतच अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना इतर पॅथीसोबत काम करू नये, असेही ‘एमएमसी’ने इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन-२००२चा दाखला देत स्पष्ट केले आहे.

पत्रच नीतिमत्तेला धरून नाही
महाराष्ट्राची किंवा देशाची आरोग्याची स्थिती पाहता इतर पॅथीसोबतच अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी सेवा देऊ नये, असे म्हणणे अयोग्य आहे. शासनाच्या अनेक रुग्णालयात एमबीबीएस, बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टर सोबत रुग्णसेवा देतात. यामुळे एमएमसीने काढलेले परिपत्रकच नीतिमत्तेला धरून नाही. ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ने  (एमसीआयएम) वैद्यकीय शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री यांना नुकतेच एक पत्र देऊन  ‘एमएमसी’च्या भूमिकेचा विरोध केला आहे.
    - डॉ. मोहन येंडे, 
    राज्य संघटक, निमा, महाराष्ट्र

Web Title: Don't work with other doctors !, MMC appeals to allopathy doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर