डोस पोहचलेच नाही, केंद्रावरून अनेक लाभार्थी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:38 PM2021-06-09T22:38:04+5:302021-06-09T22:38:34+5:30

corona vaccination लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीम संथ पडली आहे. आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्र वगळता समाज भवन, मंदीर, शाळा अशा ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर डोसची व्यवस्था करताना अधिकारी मेटाकुटीला आले आहेत.

The dose did not reach, many beneficiaries returned from the center | डोस पोहचलेच नाही, केंद्रावरून अनेक लाभार्थी परतले

डोस पोहचलेच नाही, केंद्रावरून अनेक लाभार्थी परतले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीम संथ पडली आहे. आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्र वगळता समाज भवन, मंदीर, शाळा अशा ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर डोसची व्यवस्था करताना अधिकारी मेटाकुटीला आले आहेत. सक्रीय नगरसेवकांमुळे काही केंद्रावर लसीकरण होत आहे.

वाठोडा परिसरातील शितला माता देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर बुधवारी दुपारी १.३० पर्यंत लस उपलब्ध झाली नव्हती व परिचारिका नव्हती. या केंद्रावर अनेकजण सकाळपासून चकरा मारून परत जात होते. केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडील रजिस्टरमध्ये नाव नोंदविले. प्रभागाचे नगरसेवक बंटी कुकडे यांच्याकडे तक्रार केली. ते दुपारी १ च्या सुमारास केंद्रावर पोहचले असता येथील परिचारिकेला दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. दुसरी परिचारिका आली नव्हती. तसेच लस उपलब्ध झाली नव्हती. नेहरू नगर झोनचे प्रमुख डॉ. झरारिया यांच्याशी संपर्क केला. त्या काही वेळात पोहचल्या. दर्शन कॉलनी केंद्रावरील परिचारिकेला डोस घेवून बोलवले. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास लसीकरण सुरू झाले.

मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलेली व्यवस्था पुरेशी नाही. संगणक लावले परंतु डाटा एन्ट्रीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नाही. लसीकरण मोहीम सुरू होताच हे केंद्र सुरू करण्यात आले. येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु मागील काही दिवसात लस पुरवठा होत नसल्याने त्रास वाढला. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: The dose did not reach, many beneficiaries returned from the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.