शेतकऱ्यावर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:48+5:302021-08-27T04:11:48+5:30

शेतात नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना जिवे मारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांच्या हातून चुकीने वन्यप्राणी मारले गेल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ...

A double crisis on the farmer | शेतकऱ्यावर दुहेरी संकट

शेतकऱ्यावर दुहेरी संकट

Next

शेतात नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना जिवे मारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांच्या हातून चुकीने वन्यप्राणी मारले गेल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. यावर गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना इजा पोहोचविल्यास तुरुंगाची वाट, वन्यप्राण्यांनी शेतातील पिके फस्त केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

---

प्रत्यक्षात नुकसान मोठे

कळमेश्वर तालुक्यात गत सहा वर्षांत ९८९ शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई शासनाकडून आर्थिक मदतीच्या स्वरूपात उचलली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून झालेले आहे. ज्यांना वनविभागाचे नियम व अटी माहिती आहेत असे शेतकरी वनविभागाकडे अर्ज दाखल करून नुकसान भरपाई मिळवितात; परंतु ज्यांना या नियमांचे ज्ञान नाही असे शेतकरी वनविभागापर्यंत पोहोचण्यास टाळाटाळ करतात. तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केल्यास प्रत्यक्षरीत्या नुकसानीचा एक मोठा आकडा समोर येईल.

अशी झाली भरपाई

कालावधी प्रकरणे नुकसानभरपाई

एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ १७७ १७,२०,१५० रुपये

एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ १५९ १४,८०,३३२ रुपये

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ १७७ १२,६३,६५८ रुपये

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ १२४ २०,३४,६३५ रुपये

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० १९० १८,०८,८३६ रुपये

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ १६२ १२,५२,९०८ रुपये

Web Title: A double crisis on the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.