नागपुरात  पूल डेबल डेकर दिसणार ट्रिपल डेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 09:06 PM2018-03-06T21:06:42+5:302018-03-06T21:07:08+5:30

मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर गड्डीगोदाम चौक ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ४.५ कि़मी. लांबीचा डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर गड्डीगोदाम चौकापुढे रेल्वेचा पूल आडवा गेल्यामुळे त्यावर बांधण्यात येणारा डबल डेकर पूल ट्रिपल डेकरसारखा दिसणार आहे. या ठिकाणी मेट्रो रेल्वे जमिनीपासून तब्बल २६ मीटर उंच अंतरावरून धावणार आहे.

Double Deker Metro Pool appear Triple Deker | नागपुरात  पूल डेबल डेकर दिसणार ट्रिपल डेकर 

नागपुरात  पूल डेबल डेकर दिसणार ट्रिपल डेकर 

googlenewsNext
ठळक मुद्देमेट्रो रेल्वे : गड्डीगोदामपुढे २६ मीटर उंचावरून धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर गड्डीगोदाम चौक ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ४.५ कि़मी. लांबीचा डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर गड्डीगोदाम चौकापुढे रेल्वेचा पूल आडवा गेल्यामुळे त्यावर बांधण्यात येणारा डबल डेकर पूल ट्रिपल डेकरसारखा दिसणार आहे. या ठिकाणी मेट्रो रेल्वे जमिनीपासून तब्बल २६ मीटर उंच अंतरावरून धावणार आहे.
डबल डेकर दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. पुलाचे बांधकाम आॅटोमोटिव्ह चौक आणि कडबी चौकात सुरू झाले आहे. याच मार्गावर रिझर्व्ह बँक चौक आणि एलआयसी चौक या दोन्ही वर्दळीच्या ठिकाणी लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी १०-१० मीटरचे दोन भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यात येणार आहे.
वाहतुकीसाठी भूमिगत मार्गाचा प्रस्ताव रद्द
गेल्या वर्षी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मॉरिस कॉलेज चौक ते गड्डीगोदाम चौकापर्यंत चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी भूमिगत मार्गाचा प्रस्ताव ठेवला होता. रेल्वेची कंपनी राईट्सने या मार्गाचे सर्वेक्षण करून मेट्रो रेल्वेकडे अहवाल दिला होता. या भूमिगत मार्गासाठी जवळपास ६०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. हा मार्ग खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्यामुळे भूमिगत मार्गाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. पण ४.५ कि़मी. डबल डेकरचा प्रस्ताव ‘जैसे थे’ ठेवण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेट्रो रेल्वे डबल डेकरचे बांधकाम करीत आहे. तसेच बांधकामासाठी येणारा खर्च प्राधिकरण मेट्रो रेल्वेला देणार असल्याचा उल्लेख महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना वारंवार केला आहे.
वर्धा रोडवर डबल डेकरचे बांधकाम वेगात
मेट्रो रेल्वेचा उत्तर-दक्षिण मार्ग आॅटोमोटिव्ह चौक, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, एलआयसी चौक, कस्तूरचंद पार्क, झिरो माईल्स, व्हेरायटी चौक, अभ्यंकर रोड, मुंजे चौक, धंतोली रोड, काँग्रेसनगर चौक, अजनी रेल्वे स्टेशन, जेल रोड, रहाटे कॉलनी चौक, अजनी चौक, साई मंदिर, छत्रपती चौक मार्गे प्राईड हॉटेलसमोरून मिहान डेपो आणि पुढे दोन स्टेशन असा राहणार आहे. वर्धा रोडवर अजनी चौकापासून सोनेगाव पोलीस ठाण्यापर्यंत डबल डेकरचे बांधकाम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी पिलर उभारण्यात येत आहेत, तर बहुतांश ठिकाणी गर्डर टाकण्यात आले आहेत. या शिवाय मनीषनगरचा उड्डाण पूल वर्धा मार्गावरील डबल डेकरला जोडण्यात येणार आहे.

Web Title: Double Deker Metro Pool appear Triple Deker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.