नव्या कोरोनाबाधितांचा दुहेरी आकडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:42+5:302021-09-16T04:12:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात नव्या कोरोनाबाधितांचा दुहेरी आकडा कायम राहिला. बुधवारी जिल्ह्यात १० नवे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात नव्या कोरोनाबाधितांचा दुहेरी आकडा कायम राहिला. बुधवारी जिल्ह्यात १० नवे बाधित आढळले. यात शहरातील पाच जणांचा तर ग्रामीणमधील तिघांचा समावेश होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ सक्रिय रुग्ण आहेत.
नागपूर जिल्ह्यात बुधवारी ४,२२८ चाचण्या झाल्या. यात शहरात ३,०७० चाचण्यांमधून ५, ग्रामीणमध्ये १,१५८ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर २ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२४ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४ लाख ९३ हजार ५९६ इतकी झाली आहे. बुधवारी १७ रुग्ण बरे झाले.
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ४,२२८
शहर : ५ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,९३,१५६
एकूण सक्रिय रुग्ण :७२
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,९६५
एकूण मृत्यू : १०,११९