उपराजधानीच्या एअरपोर्ट टर्मिनलवर दुप्पट भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:09 AM2019-06-27T11:09:27+5:302019-06-27T11:11:51+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन टर्मिनल बिल्डिंग क्षमतेपेक्षा दुप्पट भार सांभाळत आहे.

Double load on the airport terminal in Nagpur | उपराजधानीच्या एअरपोर्ट टर्मिनलवर दुप्पट भार

उपराजधानीच्या एअरपोर्ट टर्मिनलवर दुप्पट भार

Next
ठळक मुद्देतिसऱ्या भागीदाराची प्राथमिकता नवीन टर्मिनल बिल्डिंगसेकंड रनवेचे काम होणार चार वर्षानंतर

वसीम कुरैशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन टर्मिनल बिल्डिंग क्षमतेपेक्षा दुप्पट भार सांभाळत आहे. त्यामुळे नव्याने प्रस्तावित टर्मिनल बिल्डिंगची विमानतळाला आश्यकता आहे. विमानतळाचे भविष्यात संचालन करणारा तिसरा भागीदार सर्वात पहिले न्यू टर्मिनल बिल्डिंगचे काम करेल, त्यानंतर दुसरा रनवे चार वर्षानंतर बनवेल.
विमानतळाची प्रस्तावित न्यू टर्मिनल बिल्डिंग शिवणगाव रोडच्या भागात बनविण्यात येणार आहे. पण जीएमआरने आतापर्यंत याचे कुठलेही डिझाईन सादर केले नाही. काही दिवसांपूर्वी जीएमआरचे अधिकारी यावर चर्चा करण्यासाठी नागपुरात पोहचले होते.
जीएमआरसोबत मिहान इंडिया लि.(एमआयएल)च्या करारात पहिली प्राथमिकता न्यू टर्मिनल बिल्डिंगची आहे. एमआयएलचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, सद्यस्थितीत असलेल्या टर्मिनल बिल्डिंगची क्षमता प्रतिदिवस ९०० प्रवासी आहे. मात्र १८०० प्रवाशांचा भार सहन करीत आहे. त्यामुळे करारानुसार तिसरा भागीदार पहिले नवीन टर्मिनल बिल्डिंग बनविणार आहे.

४० लाख प्रवासी क्षमतेची राहणार नवीन इमारत
निविदेनुसार डेव्हलपरला ६४००० चौरस फुट क्षेत्रफळात नवीन टर्मिनल बिल्डिंगचे निर्माण करण्यात येणार आहे. यापूर्वी ४० लाख पॅसेंजर प्रतिवर्ष या हिशेबाने बनविण्यात येणार होते. परंतु आता प्रस्तावित टर्मिनल बिल्डिंग यापेक्षा जास्त प्रवासी संख्येच्या हिशेबाने बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. सूत्रांच्यानुसार येणाºया २५ वर्षातील वाहतूक लक्षात घेता बनविण्यात येईल. डेव्हलपर कंपनीची मार्केटिंग टीम जास्तीत जास्त विमान कंपन्यांचे आॅपरेशन नागपुरातून सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांबरोबरच विमान कंपन्यांनाही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणार आहे.

Web Title: Double load on the airport terminal in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.