डबलडेकर पुलावरून वाहनचालकांना झटके ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:12 AM2021-02-18T04:12:18+5:302021-02-18T04:12:18+5:30

नागपूर : वर्धा राेडवर निर्मित ३.१५ किलाेमीटर लांब देशातील एकमेव डबलडेकर पुलाचे लाेकार्पण नाेव्हेंबर २०२० मध्ये झाले हाेते. त्यानंतर ...

Doubledecker shocks to motorists () | डबलडेकर पुलावरून वाहनचालकांना झटके ()

डबलडेकर पुलावरून वाहनचालकांना झटके ()

Next

नागपूर : वर्धा राेडवर निर्मित ३.१५ किलाेमीटर लांब देशातील एकमेव डबलडेकर पुलाचे लाेकार्पण नाेव्हेंबर २०२० मध्ये झाले हाेते. त्यानंतर पुलावरून वाहनांची ये-जा सुरू झाली. या पुलावरून परवानगी नसतानाही ट्रक, ट्रेलरसारख्या जड वाहनांची वाहतूकही सुरू आहे. दुसरीकडे लाेकार्पणाच्या तीन महिन्यानंतरही कार व इतर वाहनचालकांना या डबलडेकर पुलावरून जाताना झटके लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुलाच्या बांधकामावरून वेगवेगळे प्रश्न निर्माण हाेत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे डबलडेकर पुलाचे बांधकाम मेस्टिक मटेरियलने झाले आहे. मेस्टिक मटेरियलमध्ये डांबर, काेळसा, फायबर व गिट्टीच्या मिश्रणाचा समावेश असताे. सध्या पुलाचा वरचा थर खडबडीत आहे. पुलावरून वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर मेस्टिक मटेरियल आपाेआप सपाट हाेईल आणि रस्ता प्लेन हाेइल, असे पूर्वी सांगण्यात येत हाेते. मात्र तीन महिन्यांनंतरही असे झाले नाही. आताही वाहनचालकांना झटके सहन करावे लागतात. पूल बांधकामाच्या तज्ज्ञांच्या मते मेस्टिक मटेरियल वितळले नसल्याने असे हाेत आहे. त्यांच्या मते मेस्टिक मटेरियल नैसर्गिकरीत्या ४० ते ५० अंश तापमानात वितळते. त्यामुळे रस्ता गुळगुळीत हाेऊन वाहनचालकांना झटके लागत नाही. या पुलावरील मेस्टिक मटेरियल २०२० मध्ये थंडीच्या ऋतूत टाकण्यात आले हाेते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून थंडी कमी न झाल्याने मेस्टिक मटेरियल वितळले नाही. लवकरच उन्हाळ्यात ते वितळेल आणि रस्ता गुळगुळीत हाेइल, असा दावा केला जात आहे.

कमी अंतरावर स्लॅब टाकूनही झटके

डबलडेकर पुलामध्ये वर मेट्राे व त्याखाली वाहनांसाठी पूल तयार करण्यात आला आहे. या दाेन्ही पुलांचा भार एकाच पिलरवर आलेला आहे. हा भार कमी करण्यासाठी स्लॅब म्हणजे एक्सपांशन ज्वाइंट्स कमी अंतरावर म्हणजे २५, २८ आणि ३१ मीटरवर लावण्यात आले आहेत. दाेन स्लॅबमधील अंतर कमी असल्याने पुलावर जाेड अधिक आहेत. यामुळेही वाहनचालकांना अधिक झटके लागत आहेत. इतर पुलांवर दाेन स्लॅबमधील अंतर ४० ते ५० मीटरवर असते.

Web Title: Doubledecker shocks to motorists ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.