नागपुरात कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ २१ दिवसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 09:33 PM2020-09-16T21:33:26+5:302020-09-16T21:34:27+5:30

शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा दुप्पट होण्याचा रेट १५ दिवसावर आला होता. आता तो वाढून २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे ही माहिती दिली.

'Doubling rate' of corona patients in Nagpur on 21 days | नागपुरात कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ २१ दिवसावर

नागपुरात कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ २१ दिवसावर

Next
ठळक मुद्देनागरिकांसाठी दिलासादायक बाब

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा दुप्पट होण्याचा रेट १५ दिवसावर आला होता. आता तो वाढून २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे ही माहिती दिली. वाढत्या प्रादुर्भावात नागपूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
आरोग्य विभागानुसार जून महिन्यात डबलिंग रेट ४४ दिवसाचा होता नंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये १५ दिवसापर्यंत आला आणि आता २१ दिवसपर्यंत पोहचल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली
डबलिंग रेट लाबल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मागील २० दिवसांमध्ये मनपाच्या माध्यमातून ५० कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मनपाची रॅपिड रिस्पॉन्स टीम पॉझिटिव्ह रुग्णांचे ‘हायरिक्स कॉन्टॅक्ट’ शोधून त्यांची चाचणी करीत आहे.

लक्षणे दिसताच चाचणी करा
कोरोना रुग्ण आपली माहिती लपवत आहेत. ते आपले फोन नंबर, घरचा पत्ता आणि घरी मधुमेह, बी.पी.सारखे आजार असलेल्या रुग्णांची माहिती देत नाही. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी करुन वेळेवर उपचार घ्यावे, असे आवाहन सनदी अधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे.

Web Title: 'Doubling rate' of corona patients in Nagpur on 21 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.