नागपूर मेट्रोच्या फेज-२ चा डीपीआर तयार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:13 PM2018-06-14T21:13:42+5:302018-06-14T21:21:32+5:30

ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रो नागपूर पूर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने तयार केलेला विस्तारित अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी राज्य शासनाद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

DPR of Phase II of Nagpur Metro ready | नागपूर मेट्रोच्या फेज-२ चा डीपीआर तयार 

नागपूर मेट्रोच्या फेज-२ चा डीपीआर तयार 

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मिळणार चालना : चार वर्षांत काम पूर्ण होणार

लोकमत न्यूज  नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रो नागपूर पूर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने तयार केलेला विस्तारित अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी राज्य शासनाद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ४८.३ कि़मी.चा विस्तार
दुसऱ्या टप्यात नागपूर मेट्रोचा एकूण ४८.३ कि.मी.चा विस्तार होणार असून त्यात एकूण ३५ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहेत. शहरालगतच्या ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी रेल इंडिया टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसच्या (आरआयटीईएस) सहकार्याने नागपूर मेट्रो टप्पा-२ चा डीपीआर तयार करण्यात आला आहे. याकरिता अंदाजे १०,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्य आणि केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर पुढीच्या चार वर्षांत या टप्प्याचे काम करण्याची तयारी महामेट्रोने दर्शविली आहे.
एकूण ८९ कि़मी. मार्गावर ७३ स्टेशन
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातले कार्य वेगाने सुरूअसून तीन वर्षांत ६० टक्क्यांहून अधिक कार्य पूर्ण झाले आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर दुसऱ्या टप्प्याच्या कार्यालादेखील सुरुवात होणार आहे. टप्पा-१ आणि टप्पा-२ च्या एकूण ८९ कि़मी.च्या मेट्रो मार्गावर ७३ स्टेशन तयार होणार आहे. स्मार्ट सिटीकडे अग्रेसर असलेल्या नागपूर शहराच्या विकासात नागपूर मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागातल्या रहिवाशांना मेट्रोमुळे मोठा फायदा होणार आहे.

सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर काम वेगात
मेट्रो रेल्वेच्या चारही कॅरिडोरमध्ये काम वेगात सुरू आहे. रिच-४ कॅरिडोरमध्ये सेंट्रल एव्हेन्यू रोड, बजेरिया, मोमीनपुरा, इतवारी व महाल या सारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठान व रहिवासी क्षेत्र आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीची मोठी गर्दी होते. मेट्रोचा फायदा या भागातील नागरिकांना होणार आहे. वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर १२५८ पैकी १०४६ पाईल बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या पाईलवर पिल्लर उभारून त्यावर लॉन्चिंग गर्डरच्या माध्यमातून सेगमेंट बसविण्याचे कार्य केले जात आहे.
रिच-४ कॉरिडोर अंतर्गत चितार ओळ ते अग्रसेन चौक, दारोडकर चौक ते टेलिफोन एक्स्चेंज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन ते वैष्णोदेवी मेट्रो स्टेशन अशा तीन ठिकाणी लॉन्चिंग गर्डरचा उपयोग होत आहे. मुंजे चौक इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनपर्यंत ८.३ कि़मी.च्या या मेट्रो मार्गावर एकूण नऊ मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे. 

असा होणार दुसऱ्या टप्प्यात नागपूर मेट्रोचा विस्तार
आॅटोमोटिव्ह चौक ते कन्हान : १३ कि़मी. लांबी, १२ मेट्रो स्टेशन, मार्गावर लेखानगर, कामठी व ड्रॅगन पॅलेस.
 मिहान ते एमआयडीसी ईएसआर, बुटीबोरी :  १८.५ कि.मी. लांबी,  १० मेट्रो स्टेशन, मार्गावर जामठा, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलोनी. 
 प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्टनगर : ५.६ कि.मी. लांबी, मेट्रो मार्गावर तीन मेट्रो स्टेशन,मार्गावर अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर व असोली.
 लोकमान्यनगर ते हिंगणा : ६.७ कि़मी. लांबी, सात मेट्रो स्टेशन, मार्गावर नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर व जवळपासच्या एमआयडीसीचा परिसर  व हिंगणा गाव.
 वासुदेवनगर ते दत्तवाडी : ४.५ कि़मी. लांब, तीन मेट्रो स्टेशन, मार्गावर रायसोनी कॉलेज, एमआयडीसी जवळपासचा परिसर, आॅर्डनन्स फॅक्टरी कॉलनी व अमरावती महामार्गावरील वाडीचा संपूर्ण परिसर.

Web Title: DPR of Phase II of Nagpur Metro ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.