सुखदेव थोरात यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:20 PM2018-06-09T23:20:26+5:302018-06-09T23:20:42+5:30
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून विविध क्षेत्रातील एका मान्यवर व्यक्तीला दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत हा पुरस्कार डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, पद्मश्री नामदेव ढसाळ, रा.सू. गवई, डॉ. यशवंत मनोहर, शरद पवार, मार्टीन मॅक्वान, सदानंद फुलझेले, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. दत्ता भगत इत्यादींना देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. २०१८ चा हा पुरस्कार डॉ. सुखदेव थोरात यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये , शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. सुखदेव थोरात यांना आतापर्यंत १२ विद्यापीठांनी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुनय करून त्यांनी देशभरात वंचितांना न्याय देण्याचे कार्य केले आहे.