नागपुरातील डॉ. भास्कर काटे यांना मरणोपरांत जीवनगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 08:43 PM2018-11-20T20:43:43+5:302018-11-20T20:44:42+5:30
अॅनॉटॉमिकल सोसायटी आॅफ इंडियाच्या वार्षिक परिषदेत नागपुरातील डॉ. भास्कर काटे यांना मरणोपरांत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅनॉटॉमिकल सोसायटी आॅफ इंडियाच्या वार्षिक परिषदेत नागपुरातील डॉ. भास्कर काटे यांना मरणोपरांत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याहस्ते त्यांची पत्नी डॉ. स्नेहलता काटे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ते उत्तम प्रशासक होते. अॅनॉटॉमीमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांचे ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅनॉटॉमीमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहे. शासकीय मेडिकल कॉलजचे ते माजी विद्यार्थी होते. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर येथे ते प्राध्यापक होते. त्यांनी पुणे, सोलापूर आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयात डीन म्हणून कार्य केले. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी प्रवरा मेडिकल कॉलेज, डी.वाय. मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथे डीन म्हणून काम केले. ते नॉमिना अॅनॉटॉमिका कमिटीचे सदस्य होते.