डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीच्या अध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 11:23 AM2021-05-19T11:23:58+5:302021-05-19T11:24:19+5:30
Nagpur News ‘वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्यूरोलॉजी’च्या ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागा’चे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची पुन्हा एकमताने निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्यूरोलॉजी’च्या ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागा’चे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची पुन्हा एकमताने निवड झाली आहे. अध्यक्षस्थानी डब्ल्यूएफएनचे माजी अध्यक्ष आणि डब्ल्यूएफएनच्या स्पेशलिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राड शाकीर होते. या बैठकीत उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, आशिया, युरोप आणि आफ्रिका या क्षेत्रातील विविध देशांचे सदस्य सहभागी झाले होते.
‘डब्ल्यूएफएन’ चे विश्वस्त डॉ. स्टीव्हन लुईस आणि डॉ. मारियाना डी व्हिझर प्रामुख्याने उपस्थित होते. विभागाचे सरचिटणीस व कोषाध्यक्षपदी होंडुरास येथील डॉ. मार्को तुलिओ मदिना यांचीही निवड करण्यात आली. लुधियाना येथील डॉ. गगनदीप सिंह हे विभागाचे वृत्तपत्राचे संपादक असतील. चार वर्षांचा या काळात उष्णकटिबंधीय रोगांवर संशोधन करेल. ज्यामुळे भारतीय उपखंड आणि इतर देशांतील लोकांना मोठ्या प्रमाणात मदत होईल.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी ही जगातील न्यूरोलॉजिस्टची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे आणि त्याचे सदस्य संघ म्हणून १२६ देश आहेत. डॉ. मेश्राम यांनी २०१७ ते २०२१ या काळात या गटाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारत आणि ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रॉपिकलन्यूरोलॉजी परिषदा आयोजित केल्या.