डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जागेच्या लीजसाठी पाठपुरावा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:47+5:302021-07-23T04:07:47+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारकाकरिता सरकारकडून प्रस्तावित जागेचे लीज नुतनीकरण होणे गरजेचे ...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारकाकरिता सरकारकडून प्रस्तावित जागेचे लीज नुतनीकरण होणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासाठी पाठपुरावा करावा, स्मारकाच्या डिझाईनकरिता वैश्विकस्तरावर आर्किटेक यांची स्पर्धा घ्यावी, असे निर्देश गुरुवारी सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारकाचा विषय मांडला. यावर आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, १९७७ मध्ये या जागेची लीज संपली. शासनाकडून ही जागा मिळाल्याशिवाय त्यावर प्रोजेक्ट उभारता येत नाही. जागेवरील स्मारकाचे ग्लोबल एस्टिमेट तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर लीज नुतनीकरण झाल्यास प्रोजेक्ट सुरू करता येणे शक्य होईल. त्यावर महापौरांनी ग्लोबल एस्टिमेट तयार करण्याचे निर्देश दिले.
...
मनपाचा लाखोंचा खर्च
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक तोडण्यावरून सभेत नाराजी व्यक्त केली. नगरसेवक संदीप सहारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सभागृह तोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. तर लीज संपल्यानंतर ही जागा शासनाची असताना या ठिकाणी अंबाझरी उद्यानाच्या देखरेखीकरिता महापालिका दरवर्षी लाखोंचा खर्च करत होती. याची चौकशी लावण्याची मागणी अॅड. धर्मापाल मेश्राम यांनी केली.