डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:56+5:302021-04-15T04:07:56+5:30
काेराडी : स्थानिक संघदीप बुद्धविहार येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...
काेराडी : स्थानिक संघदीप बुद्धविहार येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काेराडीचे सरपंच नरेंद्र धानाेले, महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक रंगारी, रत्नमाला बारमाटे, विजय वाघमारे, विनाेद रंगारी, पन्नालाल रंगारी, दिलीप वाघमारे, राजेश बारमाटे, सुमेध वाघमारे तसेच सुगत सार्वजनिक वाचालय येथील विद्यार्थी प्रतिनिधी धीरज बाेरकर, शुभम भेंडे आदी उपस्थित हाेते.
....
महादुला टी-पाॅईंट येथे महामानवाला अभिवादन
कोराडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महादुला टी-पॉईंट येथे १३० केकचे वाटप करीत महामानवाला अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी नागरिकांना केक वितरित केले. यावेळी संजय रामटेके, संदीप घुरीले, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, शुभम सोमवंशी, बबलू मस्करे, विक्की खोब्रागडे, सिध्दार्थ खोब्रागडे, सचिन चुटे, मुकुल राहांगडाले, संजय येडे, विशाल वासनिक, प्रदीप खोब्रागडे, हितेश परिहार, सुनील परिहार, सचिन पशिने व समितीचे सदस्य उपस्थित होते.
....
पाेलीस स्टेशन काेंढाळी
कोंढाळी : पाेलीस स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित कार्यक्रमाला ठाणेदार विश्वास फुल्लरवार, सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास, ग्रा.पं. सदस्य संजय राऊत आदी उपस्थित हाेते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुभाष साळवे यांनी मानले. कोंढाळी ग्रामपंचायत येथे सरपंच केशव धुर्वे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच स्वप्नील व्यास, सदस्य संजय राऊत, विनोद माकोडे, हरिदास मडावी उपस्थित होते. काेंढाळीनजीकच्या धुरखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच विठ्ठल उके यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
.....
बसस्थानक पारशिवनी
पारशिवनी : बसस्थानक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कुंभलकर, अमोल कनोजे, सचिन धनोले, गोलू बर्वे, झामेश्वर काकडे, माणिक सोमकुवर, बसस्थानक प्रमुख गजानन चौधरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रवाशांना मास्कचे वाटप करण्यात आले.
....
बडेगाव परिसरात महामानवाला अभिवादन
बडेगाव : परिसरात ठिकठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काेविड प्रतिबंधात्मक लसीकरण जनजागृती केली गेली. त्रिरत्न बौद्ध महाशाखा, टेंभूरडोह येथे सरपंच दीपक साहारे, सचिव डांबरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रूपचंद मडके, तेजराम बागडे, कमलाकर मडके, कमलाकर पाटील, केशव शेंडे, अण्णा पाटील, भानुदास मडके, आशिष बागडे, धीरज मडके, सचिन मडके, विशाल बागडे, प्रशांत पाटील, अमोल पाटील, अभय मडके, सूरज मडके, शुभांगी बागडे, मीनाक्षी मडके तसेच अंगणवाडी सेविका शशिकला बागडे, राजूस कडरेल व नागरिक उपस्थित होते.
ग्रामपंचायत बिचवा येथे सरपंच अरुणा अमर सुके तर खुबाळा येथे सरपंच अश्विनी यादव ठाकरे यांच्या उपस्थितीत महामानवास अभिवादन करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र, कोच्छी येथे महामानवास अभिवादन करून शेतकऱ्यांना काेविड लसीकरण तसेच जमिनीची सुपीकता याबाबत कृषी सहायक रोशन डंभारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवंत बनसिंगे, रवी काकडे, वासुदेव वाडकर, योगेश कुडे, उकंडराव सोनवणे, रामचंद्र कुडे व शेतकरी उपस्थित होते.