डॉ. उदय बोधनकर यांना 'कोम्हाड'चा जीवनगौरव पुरस्कार; आशियातील पहिले डॉक्टर ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 07:10 AM2022-01-12T07:10:00+5:302022-01-12T07:10:02+5:30

Nagpur News कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ ॲण्ड डिसॅबिलिटी (कोम्हाड) यांच्या वतीने वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते हा पुरस्कार मिळविणारे आशियातील पहिले डॉक्टर ठरले आहेत.

Dr. Lifetime Achievement Award for 'Komhad' to Uday Bodhankar; Became the first doctor in Asia | डॉ. उदय बोधनकर यांना 'कोम्हाड'चा जीवनगौरव पुरस्कार; आशियातील पहिले डॉक्टर ठरले

डॉ. उदय बोधनकर यांना 'कोम्हाड'चा जीवनगौरव पुरस्कार; आशियातील पहिले डॉक्टर ठरले

Next

 

मेहा शर्मा

नागपूर : कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ ॲण्ड डिसॅबिलिटी (कोम्हाड) यांच्या वतीने वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते हा पुरस्कार मिळविणारे आशियातील पहिले डॉक्टर ठरले आहेत.

ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजीनसोबत मिळून ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बोधनकर यांनी दिव्यांग व्यक्तीच्या सेवेकरिता पुरस्कार देण्यात आल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयामध्ये दिव्यांगांना विशेष सुविधा मिळाव्यात याकरिता तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केली होती. याशिवाय नागपूर विमानतळ व रेल्वेस्थानक येथे इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून दिली. त्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे नागपुरात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली. गेल्या काही वर्षांत समाजामध्ये दिव्यांगांविषयी सहानुभूती वाढत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ते 'कोम्हाड'शी २० वर्षांपासून जुळलेले असून, २००८ पासून संघटनेचे कार्यकारी संचालक आहेत.

Web Title: Dr. Lifetime Achievement Award for 'Komhad' to Uday Bodhankar; Became the first doctor in Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य