डॉ. सुधीर गुप्ता मेडिकलचे स्थायी अधिष्ठाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:59+5:302021-09-09T04:12:59+5:30
कोरोनाची भयावह ठरलेल्या दुसऱ्या लाटेत त्यांनी मेडिकलची सांभाळलेली रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाजामुळे नुकताच पालकमंत्र्यांचा हस्ते त्यांचा सत्कार झाला. इतरही ...
कोरोनाची भयावह ठरलेल्या दुसऱ्या लाटेत त्यांनी मेडिकलची सांभाळलेली रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाजामुळे नुकताच पालकमंत्र्यांचा हस्ते त्यांचा सत्कार झाला. इतरही सामाजिक संघटनेने त्यांच्या कामाचे कौतुक केले. याची दखल वैद्यकीय शिक्षण विभागानेही घेतल्याचे बोलले जाते. डॉ. गुप्ता यांनी मेडिकलच्या अधिष्ठातापदाची अतिरिक्त कार्यभाराची सूत्रे २४ फेब्रुवारी २०२१ रोजी हाती घेतली होती. विशेष म्हणजे, अतिरिक्त जबाबदारी असतानाही त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून रुग्णसेवा सांभाळली.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. गुप्ता म्हणाले, मेडिकलच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासोबतच, रुग्णसेवा आणखी प्रभावी करण्यासाठी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी उपलब्ध करून देत त्यांच्या प्रगतीसाठी आणि कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुपरमध्ये हृदयरोग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात २०१८ मध्ये डीएम अभ्यासक्रम सुरू झाले. आता न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी विभागात डीएम, एमसीएच अभ्यासक्रम सुरू करण्याच्या कार्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.