डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे मेयोचे अधिष्ठातापद
By सुमेध वाघमार | Published: January 25, 2024 06:53 PM2024-01-25T18:53:02+5:302024-01-25T18:53:10+5:30
डॉ. चव्हाण यांनी मेयोचा प्रशासकीय कामकाजात नेहमीच मदत केली आहे.
नागपूर : इंदिरा गांधाी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठातापदाचा अतिरीक्त कार्यभार गुरुवारी डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला. मेयोच्या प्रशासकीय कामकाजात डॉ. चव्हाण यांनी नेहमीच आपले योगदान दिले आहे. त्यांचा अनुभव पाहता मागील चार महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कामांना वेग येईल, असे बोलेले जात आहे.
डॉ. संज़य बिजवे यांची सहसंचालक प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर या रिक्त पदावर १९ सप्टेंबर २०२३ रोजी नियुक्ती झाल्याने मेयोचे अधिष्ठातापद रिक्त झाले होते. या पदाचा अतिरीक्त कार्यभार संस्थास्तरावर डॉ. राधा मुंजे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मेयोतील प्रशासकीय व रुग्णालयीन कामे रेंगाळल्याचा तक्रारी वाढल्या. अखेर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याची गंभीर दखल घेतली. गुरुवारी नेत्रशल्यचिकित्साशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. चव्हाण यांच्याकडे अधिष्ठातापदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्याचे पत्र धडकले.
डॉ. चव्हाण यांनी मेयोचा प्रशासकीय कामकाजात नेहमीच मदत केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) स्थापनेच्यावेळी त्यांनी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. मेयोचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी असताना त्यांनी सफाईची कामे मार्गी लावली. रुग्णसेवेत शिस्तबद्धता आणली. कोरोना काळातही ते वैद्यकीय अधीक्षक होते. त्यांनी आहे त्या सोयीत कोरोनाचा रुग्णांना उत्तमसेवा उपलब्ध करून दिल्या. याच काळात उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदही त्यांच्याकडे होते. त्यांनी तिथे कोरोनाचा उपचाराचा सोयी उभ्या केल्याने रुग्णांना मोठी मदत झाली. आता त्यांच्याकडे मेयोचे अतिरीक्त का होईना अधिष्ठातापद आल्याने अनेक रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.