डॉ. समीर पालतेवार यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:57+5:302021-08-18T04:11:57+5:30

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मेडिट्रिना रुग्णालयाचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. समीर पालतेवार यांना आर्थिक हेराफेरी प्रकरणामध्ये तात्पुरता अटकपूर्व जामीन ...

Dr. Sameer Paltewar granted interim bail | डॉ. समीर पालतेवार यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

डॉ. समीर पालतेवार यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

googlenewsNext

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मेडिट्रिना रुग्णालयाचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. समीर पालतेवार यांना आर्थिक हेराफेरी प्रकरणामध्ये तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, त्यांना प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय संजय कौल व ऋषिकेश रॉय यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रुग्णालयाचे भागधारक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी)अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये मूळ बिलापेक्षा कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा चक्करवार यांचा आरोप आहे. सुरुवातीला सत्र न्यायालयाने १५ मार्च २०२१ रोजी व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३० जुलै २०२१ रोजी पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व फिर्यादी चक्करवार यांना नोटीसदेखील बजावली व यावर उत्तर सादर करण्यास सांगितले. पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ ॲड. रणजितकुमार व ॲड. आकाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Dr. Sameer Paltewar granted interim bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.