डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा पदभार
By आनंद डेकाटे | Published: April 11, 2024 03:06 PM2024-04-11T15:06:01+5:302024-04-11T15:06:06+5:30
कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात स्वागत समारंभ पार पडला.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार डॉ. सुभाष चौधरी यांनी गुरुवारी सकाळी स्वीकारला. कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध सामाजिक संघटना तसेच समाज घटकांकडून डॉ. सुभाष चौधरी यांचे स्वागत करण्यात आले. कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात स्वागत समारंभ पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाबाबत माहिती दिली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर आदींसह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध विभागांचे उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठ विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरीक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.