विकास महात्मे आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:48 IST2018-03-22T23:48:25+5:302018-03-22T23:48:35+5:30
राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे हे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत सहभागी होणार आहेत.

विकास महात्मे आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत होणार सहभागी
ठळक मुद्दे२४ मार्चपासून जिनिव्हा येथे परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे हे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत सहभागी होणार आहेत. लोकसभा उपाध्यक्ष तंबी दुराई यांच्या नेतृत्वातील भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला असून, २४ मार्चपासून ही परिषद सुरू होणार आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय शांती, लोकशाही, संसदीय कामकाज इत्यादीसंदर्भात विविध सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. महात्मे हेदेखील परिषदेला संबोधित करणार आहेत.