डॉ. सुरेंद्र पाटील अध्यक्ष तर, डॉ. समीर जहांगीरदार सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:57+5:302021-06-26T04:06:57+5:30
नागपूर : ‘सेंट्रल इंडिया असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन’ संघटनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे ...
नागपूर : ‘सेंट्रल इंडिया असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन’ संघटनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील यांनी अध्यक्षपदाची तर प्लास्टिक सर्जरीचे विशेषज्ञ डॉ. समीर जहांगीरदार यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी माजी अध्यक्ष डॉ. सुधांशु कोठे यांनी आभार व्यक्त केले. माजी सचिव डॉ. दर्शन रेवांवर यांनी मागील वर्षी घेतलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. डॉ. पाटील यांनी म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रियेत प्लास्टिक सर्जरीचे महत्त्व, यावर प्रकाश टाकला. सोबतच २०२१-२२ या वर्षात घेणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. डॉ. जहांगीरदार यांनी आभार व्यक्त केले.
-अशी आहे कार्यकारिणी
संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ सुरेंद्र पाटील, सचिव डॉ समीर एस जहांगीरदार, उपाध्यक्ष डॉ दर्शन रेवांवर, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश चावरे, माजी अध्यक्ष डॉ सुधांशु कोठे, कार्यकारी सदस्य डॉ. मनीष जाडे, डॉ. धनंजय नाकाडे, डॉ. परीक्षित जनाई, डॉ. अमोल पटेल, डॉ. तरुण देशभ्रतार आदींचा सहभाग आहे.