ड्राेनद्वारे गावठाण माेजणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:15+5:302021-02-05T04:39:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : राज्य शासनाने ड्राेनद्वारे गावठाण माेजणी माेहीम हाती घेतली असून, कळमेश्वर तालुक्यातील गावठाण माेजणीला श्रीक्षेत्र ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : राज्य शासनाने ड्राेनद्वारे गावठाण माेजणी माेहीम हाती घेतली असून, कळमेश्वर तालुक्यातील गावठाण माेजणीला श्रीक्षेत्र आदासा येथून शुभारंभ करण्यात आला. यात गावे, गावांमधील घरे, माेकळी व गावठाच्या जागेचे माेजमाप केले जाणार असल्याची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विनाेद मेरखेडे यांनी दिली.
कळमेश्वर तालुक्यातील गावठाणाच्या माेजणीला आदासापासून सुरुवात करण्यात आली आहे. या परिसराचे माेजमाप झाल्यानंतर कळमेश्वर तालुक्यातील उर्वरित गावे व त्यांच्या गावठाणांचे ड्राेनद्वारे माेजमाप केले जाईल. ड्राेनमुळे तालुक्यातील गावामधील वाढती लाेकसंख्या, त्यामुळे गावाचा वाढता आकार, विकास याेजना, गावाच्या परिसरातील भाैगाेलिक बदल यासह अन्य बाबींची माहिती घेणे सहज शक्य हाेणार आहे. शिवाय, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुकर हाेणार असून, त्याला वेग येईल, असेही विनाेद मेरखेडे यांनी सांगितले.
शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, देवानंद कोहळे, पंचायत समिती सदस्य मालती वसू, खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष बाबाराव कोढे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार, ग्रामपंचायत प्रशासक दीपक जंगले, माजी उपसभापती नरेंद्र पालटकर, माजी सरपंच राजेंद्र जिचकार, चेतन निंबाळकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अक्षय धुर्वे, नीतू सहारे, नीता जिचकार, लीना कडू, अलका पडोळे, प्रभाकर जिचकार, गजानन निंबाळकर, विठोबा गायकवाड, संजय कडू, किशोर नागपुरे, नंदू धवड, सुधाकर पडोळे, निलेश कडू उपस्थित होते.
...
अभिलेखांचा अभाव
तालुक्यातील ग्रामीण भागात गावठाणांचे अभिलेख नसल्याने नेमकी जागा किती आहे, हे स्पष्ट हाेत नाही. गावठाणामधील बांधकाम परवाना देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया जलद होण्यासाठी ड्रोनद्वारे मोजणी केली जाणार आहे. ड्रोनद्वारे एका गावठाणाच्या मोजणीसाठी २४ मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने वेळेची बचत हाेणार असून, मोजणीत अचूकता येणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विनाेद मेरखेडे यांनी दिली.