आंभोरा उपसा सिंचन योजनेला थकीत पाणी पट्टीचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:38+5:302021-07-22T04:07:38+5:30

वेलतूर : पाणीपट्टी अडल्याने कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यास ७,५०० ...

Drainage of exhausted water strip for Ambhora Upsa Irrigation Scheme | आंभोरा उपसा सिंचन योजनेला थकीत पाणी पट्टीचा खोडा

आंभोरा उपसा सिंचन योजनेला थकीत पाणी पट्टीचा खोडा

Next

वेलतूर : पाणीपट्टी अडल्याने कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यास ७,५०० हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन थांबेल, हे निश्चित.

मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने परिसरातील धानाचे पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोवणी खोळंबली आहे. शेतकऱ्यांना आंभोरा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळणे शक्य आहे. मात्र देखभाल दुरुस्ती व विजेचे बिल भरण्यासाठी विभागाकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता के.डी.दमाये यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेत दहा दिवसात पाणीपट्टी वसूल न झाल्यास सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर काही शेतकरी व लोकप्रतिनिधीनी ही योजना बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. यासोबतच थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सिंचन विभागाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावर दमाये यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना जे शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार नसतील त्यांचे पाणीबंद करण्याचे तसेच त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोझा चढविण्याचे आदेश दिले. बैठकीला सहायक अभियंता एस.एम.वाहाने, पं.स.सभापती अश्विनी शिवणकर. जि.प.सदस्य कविता साखरवाडे, मांढळ बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, पं. स. सदस्य पंकज मेश्राम, माजी सरपंच ग्यानीवंत साखरवाडे, सुधीर बेले, गुणवंता लांजेवार आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Drainage of exhausted water strip for Ambhora Upsa Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.