विकासाचा स्वप्नसंकल्प
By admin | Published: January 1, 2016 04:05 AM2016-01-01T04:05:35+5:302016-01-01T04:05:35+5:30
२०१६ हे वर्ष उपराजधानीसाठी ‘इयर आॅफ द चेंज’ ठरणार आहे. औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या मिहानचा यंदा मेकओव्हर
२०१६ हे वर्ष उपराजधानीसाठी ‘इयर आॅफ द चेंज’ ठरणार आहे. औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या मिहानचा यंदा मेकओव्हर होणार आहे. मेट्रो रेल्वेच्या कामाच्या गाडीने वेग धरला आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडचा धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्क संत्रानगरीत आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या आॅनलाईन शॉपिंगच्या व्यापारासाठी नागपूर येथे लॉजिस्टिक हब उभारण्यात येत आहे. २०१६ मधील हे विकासाचे संकल्प नवी दिशा देणारे ठरणार आहेत.
मिहानचा ‘मेकओव्हर’
पुन्हा एकदा मिहान आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशविदेशातील कंपन्या मिहानकडे आकर्षित होत आहेत. नामांकित कंपन्यानी जागेसाठी विचारणा केली आहे. रोजगाराच्या संधी आहेत.
रिलायन्सचा ‘मेक इन इंडिया’
अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडचा धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्क २८९ एकरमध्ये उभा होणार आहे. ६५०० कोटींच्या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष २० हजार लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे लघू व मध्यम उद्योजकांमध्ये विश्वास वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहे.
इन्फोसिसचे लॉन्चिंग
इन्फोसिसला मिहान-सेझचे सहविकासक म्हणून मान्यता मिळाली आहे. इन्फोसिसने १४३.९० हेक्टर जमीन घेतली असून प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. नवीन वर्षांत या प्रकल्पाला गती येणार आहे. जवळपास ५ हजार युवकांना रोजगाराच्या संधी आहे. प्रारंभी १०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. टीसीएसचे बीपीओ युनिट सुरू झाले आहे.
‘सीएट’ धावणार
बुटीबोरी पंचतारांकित वसाहतीत आरपीजी कंपनीचा सीएट टायर प्रकल्प ५० एकर जागेत ४०० कोटींच्या गुंतवणुकीतून उभा झाला आहे. पुढील वर्षांत कार्यान्वित होईल. प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरू आहे. प्रारंभी १२०० लोकांना रोजगार मिळेल. शून्य प्रदूषण राहील. प्रकल्पात १२०० कोटींची गुंतवणूक आणि २८५० लोकांना रोजगार मिळेल.
आयटीची ‘बूम’
ेमिहानमध्ये आयटी कंपन्यांची भरभराट झाली असून दरवर्षी निर्यातीत वाढ होत आहे. पुढील वर्षांत नव्या कंपन्या पुन्हा सुरू होतील. यामध्ये अभियंत्यांना रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. मिहानमध्ये सुरू असलेल्या २२ कंपन्यांमध्ये १० सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्या मिहानमध्ये असल्यामुळे पुढील वर्षांत विकास होणार आहे.
मेट्रोची झेप
मेट्रो रेल्वे डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असून बांधकामाने वेग घेतला असून प्रारंभ डिसेंबरच्या अखेरीस झाला आहे. जर्मनी व फ्रान्सच्या वित्तीय कंपन्या मार्चअखेरीस कर्ज देणार आहेत. ८६८० कोटींचा मेगा प्रकल्प आहे.
नागपूर ‘स्मार्ट सिटी’
देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये नागपूरचा समावेश आहे. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधेसाठी रूपरेषा तयार करण्यात आली आहे. अहवाल केंद्राकडे पाठविला आहे. सर्व आधुनिक सोयीसुविधांना नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
लॉजिस्टिक हब
इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या आॅनलाईन शॉपिंगच्या व्यापारासाठी नागपूर येथे लॉजिस्टिक हब उभारण्यात येत आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूर येथून लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून कंपन्यांना ग्राहकांपर्यंत वस्तू सहजरित्या पोहचविणे शक्य आहे. यामुळे मिहानला गती मिळेल व वेअरहाऊसचा विकास होईल.