‘प्रॉपर्टी एक्स्पो’त साकारणार घराचे स्वप्न

By Admin | Published: March 27, 2017 01:59 AM2017-03-27T01:59:14+5:302017-03-27T01:59:14+5:30

ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची योजना आहे.

Dream of home coming to 'Property Expo' | ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त साकारणार घराचे स्वप्न

‘प्रॉपर्टी एक्स्पो’त साकारणार घराचे स्वप्न

googlenewsNext

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : लोकमतच्या तीन दिवसीय उपक्रमाचे थाटात उद््घाटन
नागपूर : ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेला ‘लोकमत’ हातभार लावत असून त्यांचा प्रॉपर्टी एक्स्पो उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
लोकमतचा तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो हॉटेल सेंटर पॉर्इंट रामदासपेठ येथे रविवारपासून सुरू झाला. एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी पिरॅमिड सिटीचे प्रदीप तातावार, पुष्कर होमचे कार्तिक अय्यर, पायोनियर समूहाचे अनिल नायर, टेकआॅप इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विलास हरडे, जीवन घिमे, नरेंद्र डाखळे, अथर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे नरेंद्र मलेलवार आणि मनोज सुरमवार, महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक (विपणन) सोलोमन जोसेफ उपस्थित होते. लोकमतचे उपमहाव्यस्थापक (उत्तर महाराष्ट्र, विपणन) आसमान सेठ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
लोकमतने लोकांना किफायत दरात प्रॉपर्टी उपलब्ध करून देण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. एक्स्पोच्या माध्यमातून लोकांना थेट बिल्डर्सकडून प्रॉपर्टी खरेदीची करता येईल. बावनकुळे म्हणाले, पारदर्शक व्यवहार करताना बिल्डरने प्रकल्पात ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तर दुसरीकडे शासन तुमच्या प्रकल्पाच्या दारापर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. शहराच्या विकासादरम्यान येणाऱ्या अनेक अडचणी नितीन गडकरी आणि मी सोडविल्या आहेत. लवकरच मेट्रोचा प्लॅन येत आहे. बिल्डर्सने गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि पारदर्शक व्यवहार ठेवल्यास नागपूरचा विकास शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शासनाने २४० कोटींची पेरीअर्बन पाईपलाईन योजना आणली आहे. १५ जुलैपर्यंत सुरू होणार आहे. सिमेंटचे काम सुरू आहे. बेसा येथे पोलीस स्टेशन सुरू होणार आहे. बिल्डरला फ्लॉय अ‍ॅशवर आधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी लीजवर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ही जागा डी-प्लस झोनमध्ये असल्यामुळे बिल्डर्सला अनेक योजनांचा फायदा मिळणार आहे. या ठिकाणी प्रति युनिट ४ रुपये दराने वीज मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल आणि बांधकाम स्वस्तात होईल. बिल्डर्सने एकत्रित येऊन योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये फ्लॅट, प्लॉट, फार्म हाऊस, रो-हाऊस, दुकान, बंगलो किफायत दरात खरेदीची संधी आहे. सर्व स्टॉलवर गुढीपाडवा आॅफर सुरू आहे. एक्स्पोमध्ये प्रवेश नि:शुल्क असून २८ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील. (प्रतिनिधी)

लोकमत एक्स्पोमधील स्टॉलधारक बिल्डर्स व डेव्हलपर्स
पिरॅमिड सिटी, टेकआॅप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स, द इम्पिरिएन, नानिक गु्रप, पायोनिअर, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., ग्रीन स्पेस इन्फ्रा, संदीप व्डेलर्स प्रा.लि. (एसडीपीएल), नक्षत्र बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, एचडीएफसी बँक, ओम शिवम बिल्डकॉन प्रा.लि., एन.के. रिएलेटर्स, इन्फ्राव्हेंचर प्रा.लि., श्री साई असोसिएट्स, पुष्कर होम्स प्रा.लि., प्रसन्ना डेव्हलपर्स, नीलगगन डेव्हलपर्स, डील माय प्रॉपर्टी डॉट कॉम, सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., हरीहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सेंट्रल ट्रेड कॉर्पोरेशन (ओरेव्हा), आॅरबिटल एम्पायर, जय वॉलपेपर, ‘युनिक सिटी’ एव्हीसी होम्स, कन्सेप्ट बिल्डर्स, कृष्णा बिल्डकॉन, ग्रीन लाईन.
विजेते : राजेश सोनवाने (सोन्याचे नाणे : पहिला पुरस्कार)

Web Title: Dream of home coming to 'Property Expo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.