राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’

By admin | Published: May 29, 2017 05:27 PM2017-05-29T17:27:17+5:302017-05-29T17:27:17+5:30

राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.

Drinking water revolution in 43 villages | राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’

राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’

Next

प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४३ गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. २५ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातून ग्रामीणांसाठी ‘पेयजल’ निर्माण करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम राज्यभरात सन २०१६ -२०१७ ते २०१९-२० या चार वर्षांसाठी राबविण्यात येणार असून या कार्यक्रमाचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीचे कोणतेही अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला राहणार नाही. ही योजना जिल्हा परिषद प्रशासन हाताळणार आहे.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर, आमगाव व साकोली तालुक्यातील सुकळी या गावांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मंजूर झालेली योजना
भंडारा- गणेशपूर, साकोली, आमगाव; यवतमाळ - ब्रम्ही, वेणी; जालना- लोणी (खु), आनंदगाव ; चंद्रपूर- लखमापूर, गोविंदपूर ; अहमदनगर- रस्तापूर, डोणगाव; सोलापूर- ज्योतीबाची वाडी, अकोले मंद्रुप, नरोटेवाडी, उमरगे ; सांगली - डोंगरसोनी, हिंगणगाव, हिवरे; वर्धा- कानगाव, डोंगरगाव ; गोंदिया- रापेवाडा, नवरगाव, डोंगरगाव, सहेसपूर ; नांदेड -दुगाव, निमगाव ; नागपूर - तामसवाडी, मानेगाव, रेवराळ ; जळगाव - जुनोने, वाधळी, भोद, चिचंपुरे ; नाशिक- भेगु ; अकोला-गोरेगाव, अन्वी, सारकिन्ही, दगडपारवा, धोत्राशिंदे, सोनाळा, मनाब्दा ; परभणी - हिस्सी, रायपूर

Web Title: Drinking water revolution in 43 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.