नागपुरात भरधाव कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:43 AM2018-11-25T00:43:45+5:302018-11-25T00:44:33+5:30

अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते.

Driver dies due to a car accident in Nagpur | नागपुरात भरधाव कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू

नागपुरात भरधाव कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देकार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर धडकली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते.
शुक्रवारी मध्यरात्री मनवानी त्यांच्या ह्युंंदई कारने (एमएच १९/ बीजे ५८७४) नारा मार्गाने वेगात जात होते. जरीपटक्यात त्यांची कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर धडकली. कारचा वेग जास्त असल्याने दुभाजकावर धडकल्यानंतर कार उसळून उलटली. त्यामुळे मनवानी गंभीर जखमी झाले. तातडीने औषधोपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळाल्यानंतर जरीपटक्यातील सिंधी समुदायातील मंडळी मोठ्या संख्येत रुग्णालयात दाखल झाली. महेश जेठनन कुकरेजा (वय ४९, रा. बँक कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Driver dies due to a car accident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.